Home गडचिरोली कारवाफा आश्रमशाळेचा दहावीचा निकाल ८४.६२ टक्के

कारवाफा आश्रमशाळेचा दहावीचा निकाल ८४.६२ टक्के

16
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा दहावीचा निकाल ८४.६२ टक्के लागला. परीक्षेला बसलेल्या ५२ विद्यार्थ्यांपैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

सुरेखा संतू कुमोटी ही विद्यार्थिनी ६८.२० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविली. द्वितीय श्रुती बाबुराव उसेंडी (६५ टक्के) तर तृतीय क्रमांक घेऊन करीना मारोती आतला (६४.८० टक्के) उत्तीर्ण झाली.
३१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व ४ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. कॉपीमुक्त वातावरणातही सदर शाळेने सातत्याने यशाची परंपरा कायम राखली. मागील दोन वर्षे शाळेचा निकाल ९२ टक्के व ९७.२२ टक्के लागला. यावर्षी या शाळेचा बारावीचा निकाल देखील ८६.८४ टक्के लागला.

मुख्याध्यापक विष्णू चव्हाण, माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, व्ही. एस. देसू , वर्षा मस्के, चंदा वानखेडे, उच्च माध्यमिक शिक्षक टी. ए. आस्कर, पद्मावती महेशगौरी, सी. डी. नळे, एम. ई. ठाकूर, चंदा कोरचा, रविकांत पिपरे, व्ही. एम. नैताम, आय. एम. कुमरे, संजय धंदर, कविता बारसागडे, आशिष नंदनवार, अधीक्षक भारत कोरडे, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, स्वप्निल राठोड, अभय कांबळे, करिश्मा गोवर्धन, हितेश गावळकर, पवन मेश्राम, योगेश उसेंडी, शिवानी शेट्टीवार, सुनिता देवावार, संगीता करंगामी आदींसह कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

error: Content is protected !!