Home गडचिरोली नवरदेवाची प्रकृती बिघडताच माजी खासदार डॉ. अशोकजी नेते धावले मदतीला

नवरदेवाची प्रकृती बिघडताच माजी खासदार डॉ. अशोकजी नेते धावले मदतीला

13

– विवाह सोहळ्याला मा. खा. डॉ. नेते यांनी उपस्थित राहून नववधूवरास दिला शुभाशीर्वाद

विदर्भ क्रांती न्यूज

​गडचिरोली : इंदिरानगर गडचिरोली येथील भाजपचे ज्येष्ठ नेते नरेशजी हजारे यांच्या मुलाचे विवाह सोहळा सावली तालुक्यातील व्याहाड बुज. येथे पार पडला. मात्र लग्नाच्या धामधुमीत कडक उन्हाचा तडाखा बसल्याने नवरदेवाची प्रकृती अचानक बिघडली. या प्रसंगाची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी तत्काळ दवाखान्यात धाव घेत माणुसकीचे दर्शन घडवले.

१९ एप्रिल रोजी पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून वधु-वरांना शुभाशीर्वाद दिले. सोहळा आटोपल्यानंतर नवरदेवाला उन्हाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने डॉ. अमित बाटवे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांशी संवाद आणि तब्येतीची विचारपूस
​उद्याच लग्नाचा स्वागत समारंभ (Reception) असल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. ही बाब समजताच मा. खा. डॉ. नेते यांनी स्वतः दवाखान्यात जाऊन डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली. “उद्या महत्त्वाचा कार्यक्रम असल्याने नवरदेवाला तातडीने उपचार देऊन बरे करा,” अशी सूचना त्यांनी डॉक्टरांना केली. तसेच उपस्थित नागरिकांना वाढत्या उन्हात स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

​यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, माजी ग्रा. प. सदस्या पुष्पा ठाकरे, विजय सातपैसे, प्रशांत अलपटलावार, रमेश सहारे, किसन ठाकरे यांच्यासह हजारे, सोनटक्के आणि बावनकर परिवार उपस्थित होता.

​”राजकारणापलीकडे जाऊन कार्यकर्त्याच्या सुख-दु:खात धावून जाण्याच्या मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या तत्परतेचे परिसरात कौतुक होत आहे.”

error: Content is protected !!