Home गडचिरोली अक्षय तृतीयानिमित्त चामोर्शीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची भेट

अक्षय तृतीयानिमित्त चामोर्शीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची भेट

17

– मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनी देवस्थान बांधकामासाठी दिला मदतीचा हात

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पवित्र आणि शुभ मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयानिमित्त चामोर्शी येथील श्री माता चवडेश्वरी देवस्थान सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांची भेट घेतली.

चामोर्शीतील श्री. माता चवडेशवरी देवस्थान हे लोक सहभागातून साकार होत असून या भेटीत देवस्थानाच्या सुरू असलेल्या बांधकामासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी जपत मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनीही या पवित्र कार्यात देणगीच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करत बांधकामासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या सहकार्यामुळे देवस्थानाच्या उभारणीला नवे बळ मिळणार असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अक्षय तृतीया या मंगलमय दिवशी झालेल्या या भेटीमुळे देवस्थानाच्या कार्याला सकारात्मक दिशा मिळाल्याचेही यावेळी उपस्थितांनी सांगितले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष केशवराव आंबटवार, उपाध्यक्ष महेश ऐयलावार, सचिव अनिल ऐयलावार, कोषाध्यक्ष मोरेश्वर चलकलवार, संचालक नरेंद्र कोतावार, दीपक येनूरवार, नितीन कोतावार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!