विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : नवयुवक बौद्ध समाज जोगना (ता. चामोर्शी) यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले.
या सोहळ्यास गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित राहून तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे व कार्याचे महत्त्व सांगितले. समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या त्यांच्या योगदानाची माहिती देत, त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष धानोरा प्रशांत कोराम, नदीम नाथानी, सुधाकर वासेकर, संतोष गव्हारे, कुणाल ताजने, सिद्धार्थ मेश्राम, आदित्य वाळके, रवी मेश्राम, सुरेश फुलझेले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.







