डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज चातगाव येथे 1 मार्चपासून ओपन टॅलेंट काँटेस्ट

13

– रोगनिदान शिबिर, नृत्य व वादविवाद स्पर्धांचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज स्टुडंट नर्सेस असोसिएशन चातगाव (ता. धानोरा, जि. गडचिरोली) यांच्या वतीने ओपन टॅलेंट काँटेस्टचे आयोजन 1 व 2 मार्च रोजी डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज चातगाव येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी, 1 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. या निमित्ताने शनिवारी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत मोफत रोगनिदान औषधी वाटप शिबिर आयोजित केले आहे.