राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहीद कुटुंबीयांचा सन्मान

19

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा गडचिरोलीतर्फे २६ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता पार पडलेल्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर गोकुळनगर गडचिरोली येथील आशीर्वाद सभागृहात शहीद कुटुंबीयांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, प्रदेश चिटणीस ॲड. संजय ठाकरे, गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार, जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, माजी नगरसेविका मीनल चिमुरकर, सेवादल तालुकाध्यक्ष सुनिल कत्रोजवार, शहर उपाध्यक्ष भास्कर निमजे, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष चंदू शिवणकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील चिमुरकर, जिल्हा उपाध्यक्ष विमल भोयर, ओबीसी महिला जिल्हा उपाध्यक्षा निता बोबाटे, तालुका मुख्य संघटक निलेश कोटगले, सेवादल शहर अध्यक्ष मल्लया कालवा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचे हस्ते शहीद कुटुंबातील महिलांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व संविधान उद्देशिका प्रत देऊन गौरविण्यात आलं. यावेळी रेखाताई फागु कोराम, संगीता विलास मांदाळे, नयना पुरुषोत्तम मेश्राम, विजया रवींद्र चौधरी, लक्ष्मी परदेशी देवांगन, निर्मला सुरेश गावडे, कल्पना पुरनशहा दुग्गा, सगुना दानशु वडे, समीना हेमराज टेंभुर्णे, हर्ष संतोष दुर्गे, राशीत डोगे आत्राम, अलका अविनाश रणदिवे, मनीषा दुर्योधन नागतोडे, तसेच वीर शहीद स्वरूप अमृतकर यांच्या मातोश्री कल्पना अमृतकर यांच्यासह आदी शहीद कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शहीद कुटुंबीयांनी आपापल्या अडचणी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी शहीद कुटुंबांच्या सन्मान सोहळ्याला मार्गदर्शन करताना सांगितले की, पुढील काळात संपूर्ण शहीद कुटुंबीयांच्या ज्या काही अडीअडचणी असतील आपण स्वतः शहीद कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहून समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू. शहीद कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन राज्यस्तरावर समस्यांचा पाठपुरावा करून शहीद कुटुंब यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन दिले व 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शहीद कुटुंबीयांचा मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेविका मीनल चिमूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर उपाध्यक्ष भास्कर निमजे यांनी केले.