अरततोंडी येथील जलशुद्धीकरण व शितकेंद्राचे कृष्णा गजबे यांच्या हस्ते लोकार्पण

17

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव ग्रामपंचायत अरततोंडी येथील नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधीतून “जल शुध्दीकरण व शितकेंद्र प्लांट” मंजूर करण्यात आले आहे. सदर काम जलद गतीने पूर्ण झाले असून या “जल शुद्धीकरण व शितकेंद्र प्लांट’ (ATM R.O.PLANT) चे लोकार्पण आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते पार पडले.

याप्रसंगी सरपंच विजय तुलावी, ग्रा.पं. सदस्य राकेश खुणे, ग्रा. प. सदस्य देवंगणा कंन्नाके, सचिव श्रीमती राऊत, प्रतिष्ठित नागरिक नामदेव दखणे, उल्हास खुणे, नामदेव हणवते, सुनिता मेश्राम, चिंतामण नाकाडे, खुशाल दखणे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.