विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील गांगोली येथे शालेय बालक्रीडा व कला संमेलन १७,१८ ते १९ डिसेंबर २०२४ पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगोली येथे आयोजित करण्यात आले होते. या केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती कुरखेडाचे संवर्ग विकास अधिकारी धीरज पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रविंद्र शिवणकर, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल मुलकलवार, ग्रामपंचायत खरकाडाचे/गांगोलीचे सरपंच किशोरजी गावले, ग्रामपंचायत सावरखेड्याचे सरपंच अविनाश टेकाम, ग्रामपंचायत कढोलीचे सरपंच पारिकाताई रंदये, गटग्रामपंचायत सोनेरांगीचे सरपंच बाबुरावजी कुमरे, गटग्रामपंचायत उराडीचे सरपंच सोनीताई वट्टी, गटग्रामपंचायत भगवानपूरचे सरपंच भारती कुमोटी, ग्रामपंचायत खरगडाचे सरपंच आवडाबाई गायकवाड, पत्रकार भास्करजी वैरागडे, तसेच केंद्रातील सर्व शाळा मुख्याध्यापक, सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष गण, सर्व सदस्य गण, विद्यार्थी विद्यार्थिनी व माता पालक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.