विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील आंबेटोला येथे समिश्र नाट्य कला मंडळ आंबेटोला यांच्या सौजन्याने ‘माऊली’ या नाटकाचे आयोजन 15 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या नाटकाचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते करण्यात आले.
वर्षभर बळीराजा शेतात राबतो शेतीची मळणी होताच ग्रामीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांच्याच एक भाग म्हणून आंबेटोला येथे समिश्र नाट्य कला मंडळ आंबेटोला यांच्या सौजन्याने ‘माऊली’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला यादवजी लोहबरे, संजय बोबाटे, मुखरू जुमनाके, गोपीनाथ उंदिरवाडे, रमेश ठाकरे, रामभाऊ बाबनवाडे, माणिक भैसारे, कालिदास भोयर, रामदास साखरे, पितांबर आत्राम, भारत बानबले, रेवनाथ मेश्राम, नामदेव कोडाप, समीर साखरे, संतोष दिवटे, पांडुरंग साखरे, आशिष म्हस्के, रमेश कोहपरे, दिगंबर ठाकरे, वसंत सयाम, नीलकंठ म्हस्के, केशरी भोयर, नितेश ठाकरे, धनंजय म्हस्के, रवींद्र भोयर, कालिदास पोटावी, गिरीधर ठाकरे, मारोती भोयर, प्रभाकर कोहपरे, केशव सयाम, साधू पोटावी, डबाजी साखरे, सचिन ठाकरे, अमृत साखरे, तुमदेव म्हस्के, दिलीप भोयर, पुरुषोत्तम मंगर, अविनाश दाणे, कालिदास भोयर आदी शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.