प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत कारवाफा बिट अव्वल

53
Oplus_131072

– सात तालुक्यातील ४१ आश्रमशाळांचा सहभाग : भाडभिडी बिट ठरला उपविजेता

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत गडचिरोली प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचा समारोप येथील सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर रविवार ,१५ डिसेंबर रोजी झाला. या क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक २९१ गुण प्राप्त करून कारवाफा बिट विजेता ठरला तर भाडभिडी बिटाने २७३ गुणासह उपविजेतेपद प्राप्त केले. विजेता व उपविजेता संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. मागील वर्षी देखील प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत कारवाफा संघ विजेता व भाडभिडी संघ उपविजेता ठरला होता.

पारितोषिक वितरण प्रभारी प्रकल्प अधिकारी वहीद शेख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रकल्प अधिकार अनिल सोमनकर, डॉ. प्रभु सादमवार, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोष कन्नाके, मुकेश गेडाम, रोशन पेंद्राम, उर्मिला सिडाम, रोशन कुमरे, चंद्रशेखर सिडाम, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, क्रीडा समन्वयिका प्रमिला दहागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संमेलनात जिल्ह्यातील सात तालुक्यातील कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १७ अनुदानित अशा एकूण ४१ आश्रमशाळेतील सुमारे अकराशे खेळाडूंनी सहभाग घेतला. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात सांघिक व वैयक्तिक खेळाचे आयोजन केले होते.

विजेत्या कारवाफा बिटात कारवाफा, गडचिरोली, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही या शासकीय तर चांदाळा ,गिरोला, गट्टा येथील अनुदानित आश्रमशाळांचा समावेश आहे. उपविजेत्या भाडभिडी बिटात भाडभिडी, रेगडी, मार्कंडादेव या शासकीय तर गुंडापल्ली, अड्याळ, चामोर्शी,कन्हाळगाव येथील अनुदानित आश्रमशाळांचा समावेश आहे.

स्पर्धांमधून आदिवासी विद्यार्थ्यांचे सुप्त क्रीडा कौशल्य प्रदर्शित झाले. पारितोषिक वितरणानंतर मैदानावर खेळाडूंनी आनंद साजरा केला. यावेळी स्फूर्तीदायी गीतावर खेळाडू सोबत अधिकारी व कर्मचारीही थिरकले.

सांघिक खेळाच्या पारितोषिक वितरणाचे संचालन सुभाष लांडे व प्रा.अजय जाधव तर वैयक्तिक खेळाच्या पारितोषिक वितरणाचे संचालन बळीराम जायभाये, निलेश कळंब यांनी केले. संपूर्ण क्रीडा संमेलनाचे वृत्तलेखन प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे यांनी केले. क्रीडा समन्वयक सतीश पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पाचही बिटातील क्रीडा निरीक्षक रविकांत पिपरे, धर्मेंद्र कुसराम, आशिष डबाले, मोहन मारबते, निलय गडे, अशोक परतेकी, आनंद बहिरेवार, नेताजी गावड, पुरुषोत्तम बखर, महेश बोरेवार, अनिल सहारे, जगजीवन शेलोकर, नितीन चंबुलवार, विनायक क्षीरसागर, देविदास चोपडे, गुलाब डोंगरवार, कार्तिक जावळे, सचिन भालेकर, गणेश लेनगुरे, भूपेंद्र गेडाम, निमा राठोड, विलास मडावी, डाकराम घोंगडे आदींसह मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, विविध समितीचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.