केंद्रस्तरीय बाल क्रीडा संम्मेलनात हळदीमाल शाळा अव्वल

67
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील गणपूर रै. केंद्र अंतर्गत येणाऱ्या मुधोली चक नं. 2 येथे केंद्रस्तरीय बाल क्रीडा सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. यात जि. प. उच्च प्राथमिक शाळा हळदीमाल येथील विद्यार्थ्यांनी केंद्रातून कबड्डी, खो-खो व सांस्कृतिक कार्यक्रमात प्राविण्य शिल्ड प्राप्त केली.

शाळेच्या शिक्षिका हुताशनी तागडे, चित्रा जांगधुर्वे, प्राजक्ता बांबोळे व निर्मला शेट्टे यांच्या प्रयत्नाने हे यश संपादन केले. चॅम्पियन्स शिल्ड घेतल्याबद्दल चामोर्शीचे गटशिक्षणाधिकारी टेंभुर्णे, शिक्षण विस्तार अधिकारी कोत्तावार, गणपूर रै. केंद्राचे केंद्रप्रमुख जनार्दन म्हशाखेत्री, मुख्याध्यापक दामोधर बामनवाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निता गेडाम, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मनोज भोयर, शा. व्य. स. सदस्य रंजय झाडे, मनोज चुधरी, इतर सदस्य व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.