– नागपूर चक येथे दिवस -रात्रकालीन कबड्डी स्पर्धा व वायगाव क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील युवकांचा मैदानी उत्साह वाढविण्यासाठी आज, १२ डिसेंबरला जय बजरंग क्रिडा मंडळ नागपूर चक यांच्या सौजन्याने दिवस – रात्रकालीन भव्य कबड्डी सामने तसेच सार्वजनिक नवयुवक क्रीडा मंडळ वायगाव यांच्या वतीने भव्य ग्रामीण रबरी बाँल क्रिकेट स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते.
कबड्डी व क्रिकेट या दोन्ही कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते म्हणाले की, आजच्या काळात मैदानी खेळ अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आजचे अनेक युवक वर्ग हे दिवसेंदिवस मोबाईलमध्ये व्यस्त असताना दिसते. अशावेळी त्यांच्या शरिराची हालचाल होत नाही. यासाठी शरीर तंदुरुस्तीसाठी व निरोगी राहण्यासाठी अशा मैदानी खेळाचे अतिशय आवश्यक आहे. आठ दहा दिवस चालणाऱ्या या दोन्ही खेळाला शुभेच्छा देतोय. आपण चांगल्या पद्धतीने व वादविवाद न करता पंचांचा निर्णय अंतिम मानून खेळ खेळावे, असे प्रतिपादन उद्घाटनप्रसंगी माजी खासदार अशोकजी नेते यांनी केले.
पुढे बोलताना नेते म्हणाले, मी माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विकासाभिमुख कामे केली. यामध्ये वडसा गडचिरोली रेल्वे मार्ग, तसेच जिल्ह्यामध्ये रेल्वेचे जाळे,मेडिकल काॅलेज, सुरजागड लोह प्रकल्प, कृषि महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती, हवाई पट्टा, रस्त्याचे कामे, नँशनल हाँयवेची कामे, सिंचनाच्या बाबतीत चिचडोह बॅरेजेस, कोटगल बॅरेजेस असे विविध विकासाचे कामे लोकसभा क्षेत्रात केलेली आहेत.
आपल्या गावातील अडीअडचणी समजून घेत आपण लोकसभेमध्ये दिलेल्या सहकार्याबद्दल आभार तसेच नुकत्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत गडचिरोली विधानसभेतील भाजपाचे उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यात आपल्या गावाचा सहकार्य लाभला. त्याबद्दल मी सुद्धा आपले मनापासून आभार व्यक्त करतो.
मी आपल्या गावच्या अडीअडचणी समजुन घेत आपल्या नागरिक जनतेच्या सतत सेवेत मी सदैव राहीन व होत असलेली विकासाची कामे न थांबवता आपल्या नेहमीच पाठीशी अडचणीत राहील, अशी ग्वाही नागपूर चक व वायगाव या गावातील कबड्डी व क्रिकेट या दोन्ही खेळाच्याप्रसंगी मा. खा. नेते यांनी बोलून दाखवली.
यावेळी नागपुर चक व वायगांव या गावातील मंडळाने मा. खा. अशोकजी नेते यांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरे यांनी मा. खा. नेते यांना गावातील उद्भवणाऱ्या विविध समस्या जाणत व निदर्शनास आणुन देत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
यावेळी प्रामुख्याने नागपुर चक येथील जेष्ठ नेते पत्रुजी भाकरे, नंदाजी आभारे, ताराचंद वेलादी, दिवाकर भोयर, डॉ. हेमंत भाकरे, नोमेश जुवारे, राजेश सयाम, युवराज खेडेकर, देवराव जुवारे तर वायगाव येथील भाजपा नेते किसनजी कोसरे, माजी पं. स.सदस्य विनोद मडावी, सामाजिक नेते रामदास नेवारे, राजगोपालपूर, ग्रा. प. सदस्य साईनाथ आत्राम तसेच नागपूर चक व वायगाव येथील नागरिक जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.