कबड्डी म्हणजे शारीरिक तंदुरूस्ती व निरामय जीवनाचा खेळ : अरविंद कात्रटवार

25
Oplus_131072

– चांभार्डा येथे रंगला कबड्डीचा रणसंग्राम

– शिवसेना (उबाठा) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कबड्डी हा मैदानी आणि सांघिक खेळ आहे. या खेळाचा उगम हजारो वर्षापुर्वी झाला. पुर्वीच्या काळी कबड्डीचा खेळ खेड्यापाड्यात शारिरीक तंदुरूस्तीसाठी खेळला जायचा. या खेळाची महत्ती आजही कायम आहे. आता ग्रामीण भागाबरोबरच शहरीभागात सुध्दा हा खेळ अतिशय लोकप्रिय झाला असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहचला आहे. कबड्डीच्या मोठ्या स्पर्धा आयोजीत केल्या जात आहेत. या खेळामुळे शारिरीक व मानसिक तंदुस्ती बरोबरच निरामय जीवनाची प्राप्त होते. त्यामुळे युवकांनी मैदानी खेळावर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.

शिव स्वराज्य क्रीडा मंडळ चांभार्डाच्या वतीने भव्य ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्‌घाटन कात्रटवार यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी खेळाडू व उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. ग्रामीण भागातील युवकांच्या क्रीडागुणांना चालणा देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील विजेत्या संघाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने 30 हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषीक देऊन गौरविण्यात येणार आहे.

अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, प्रत्येक युवकांमध्ये क्रीडा गुण असतात. त्याच्या क्रीडागुणांना वाव देऊन योग्य ते मार्गदर्शन व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जगभरात क्रीडा क्षेत्राला महत्व प्राप्त झाले असून या क्षेत्रात युवकांना आपले ‘करीअर’ घडविण्याची संधी आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात आवड असलेल्या युवकांनी खेळावर लक्ष केंद्रीत केल्यास ग्रामीण भागातून उत्कृष्ट खेळाडू निर्माण होऊ शकतात.
कबड्डी हा सांघीक खेळ असून विजयात प्रत्येक खेळाडूचे योगदान लाभले पाहिजे. संघातील प्रत्येक खेळाडूंनी संघभावनेने खेळाचे प्रदर्शन करून उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवावे. स्पर्धेच्या माध्ममातून प्रत्येक खेळाडूला आपल्या क्रीडागुणांची छाप पाडण्याची संधी मिळते. त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून क्रीडा क्षेत्रात आपला नावलौकिक वाढविला पाहिजे. मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील युवकांच्या क्रीडा विकासासाठी मी कटीबध्द आहे. खेळाडूंना आवश्यक ती मदत भासल्यास सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहे, असेही अरविंदभाऊ कात्रटवार याप्रसंगी म्हणाले.

याप्रसंगी सुरेश कोलते, लोमेश कुमरे, चेतन चिकराम, खुशाल मेश्राम, महेश लाजूरकर, पराग कुमरे, आदित्य सेलोकर, अंकुश झाडे, दीपक आभारे, प्रांजल कोलते, प्रतिक मसराम, मयूर भोयर, धनंजय चापले, सुरज चिकराम, राहुल हलामी, प्रफुल किरंगे, गौरव पाल, साहिल ठाकरे, लिकेश देशमुख, रुपेश आजबले, साहिल कोलते, अभिजित खेवले, प्रफुल चणेकार, मोहित लाजूरकार, अमित कोटगले, पंकज चनेकार, तन्मय कोटगले, संजय लडके, निशांत शेडमाके, वैभव रेचनकार यासह शेकडो शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते.