कृष्णा गजबे यांना पुन्हा निवडून द्या, मतदारसंघाच्या विकासाची गॅरंटी माझी : ना. नितीन गडकरी

25
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

 गडचिरोली : आरमोरी विधानसभा मतदारसंघात भाजप-महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांच्या प्रचारार्थ कुरखेडा येथे केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी प्रचार सभेला संबोधित करताना आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. पुन्हा त्यांना निवडून द्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची गॅरंटी माझी असे बोलून नामदार नितीनजी गडकरी यांनी आमदार कृष्णा गजबे यांना पुन्हा निवडून देण्याचे उपस्थित जनसमुदायाला आवाहन केले. तत्पूर्वी सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरड्डीवार यांनी नितीनजी गडकरी यांचे हेलिपॅडवर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गडकरींच्या आगमनानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित जनतेने त्यांना टाळ्या वाजवून घोषणा देत मोठा प्रतिसाद दिला.

गडकरी यांनी आपल्या भाषणात आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांच्या विकासकामांवर प्रकाश टाकला. त्यांनी गजबे यांच्या गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारभाव मिळवून देणे, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि संपूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी कटीबद्ध राहण्याचे काम केल्याचे गौरविले. “गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेला गरिबी आणि बेरोजगारीतून बाहेर काढणे हेच माझे उद्दिष्ट आहे,” असे ते म्हणाले.

विकासाच्या दिशेने भरीव कामगिरी
गडकरी यांनी सांगितले की, आरमोरी मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला गेला आहे. विशेषतः कुरखेडा परिसरात रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पूल बांधणी आणि दळणवळणाच्या सुविधा वाढविण्यासाठी 164 कोटी रुपये मंजूर झाले असून, हे काम लवकरच पूर्ण होईल. त्यांनी रायपूर ते विशाखापटनम या 55 हजार कोटी रुपयांच्या ग्रीन फील्ड एक्सप्रेस हायवेचे महत्त्व सांगितले, जो गडचिरोलीला थेट रायपूर आणि विशाखापटनमशी जोडेल.

राष्ट्रीय महामार्गांची विकास योजना
गडकरी यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे 57 किमीवरून 598 किमीपर्यंत वाढविले असल्याचे नमूद केले. यातून जिल्ह्यातील दळणवळण आणि व्यापार वाढीला चालना मिळणार आहे. “अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे एक वाक्य माझ्या ऑफिसमध्ये लिहिलेला आहे ते मी नेहमी लक्षात ठेवतो – जॉन एफ. केनेडी म्हणतात की अमेरिकेचे रस्ते चांगले नाही कारण अमेरिका श्रीमंत आहे ‘अमेरिका श्रीमंत आहे कारण तिचे रस्ते चांगले आहेत’. त्याचप्रमाणे गडचिरोलीचा विकास रस्त्यांमुळेच शक्य होईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. दुग्धव्यवसायाचे महत्त्व विशद करुन आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दुग्धव्यवसायाला मोठी संधी असल्याचे सांगून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसोबत गायींची जोपासना करावी व दुग्धव्यवसाय वाढीसाठी आवश्यक मदतीचे आश्वासन दिले.

यावेळी मंचकावर सहकार विकास महामंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, पद्मश्री डॉ. परशुराम खूणे, जिल्हा नागरी सहकारी बैंकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार कृष्णा गजबे, भाजपा विधानसभा निरीक्षक श्रीनिवास, लोकसभा समन्वयक किशन नागदेवे, शिंदेसेनेचे विधानसभा समन्वयक नारायण धकाते, राकाँ अजीत पवार गटाचे विधानसभा समन्वयक किशोर तलमले, अयुब खान, मोतीलाल कूकरेजा, गणपत सोनकूसरे, रविन्द्र गोटेफोडे, बबलू हूसैनी, माधवदास निरंकारी भाजपा अनुसूचित जाति सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड उमेश वालदे, डॉ. टि .एन बूद्धे, खेमनाथ पाटील डोंगरवार, वसंतराव मेश्राम, व्यंकटी नागीलवार,खिळसागर नाकाडे, वामनराव फाये, शिंदेसेनेचे अनिकेत आकरे, विलास गावंडे,सागर निरंकारी, शिंदेसेना महिला जिल्हा प्रमूख अर्चणा गोंधोळे, गिता कूमरे, नाजूक पूराम, माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, भारत बावनथळे, पंकज खरवडे, आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. गडकरींच्या प्रभावी भाषणाने जनतेत जोश आणि आत्मविश्वास भरला आणि आरमोरीतील जनतेने पुन्हा भाजप-महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांना भरघोस पाठिंबा देण्याचे संकेत दिले.