भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे व डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी घेतली मारहाण झालेल्या विद्यार्थिनींची भेट

46
Oplus_0

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका उज्वला पाटील यांनी इयत्ता सातवी वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पाण्याच्या बाटलीमध्ये काही टाकल्याच्या शिल्लक कारणावरून 17 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. यात धनश्री हरिदास दहेलकर व लावण्या कुमदेव चौधरी या विद्यार्थिनीं बेदम मारहाण केल्यामुळे जखमी झाल्या व त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले.

घटनेची माहिती भाजपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांना मिळताच त्यांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडी जिल्हा प्रभारी डॉ. मिलिंदजी नरोटे, भाजपा ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सचिव किसान मोर्चा रमेशजी भुरसे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर यांना सोबत घेऊन रुग्णालय गाठले व विद्यार्थिनींची तसेच त्यांच्या पालकांची भेट घेऊन घटनेबद्दल सविस्तर विचारपूस केली व पालकांना धीर देत विद्यार्थ्यांनींची काळजी व काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिले.