महाविद्यालयांना BBA, BCA चे अभ्यासक्रम चालविण्यात येणाऱ्या अटी शिथिल कराव्यात

30

– आमदार अभिजीत वंजारी यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना केली विनंती

विदर्भ क्रांती न्यूज

नागपूर : राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत सर्व महाविद्यालयातील BBA, BCA हे दोन्ही अभ्यासक्रम AICTE च्या कार्यकक्षेत आल्यामुळे DTE मुंबईच्या परिपत्रकानुसार सर्व महाविद्यालयांना हे दोन्ही अभ्यासक्रम चालवण्यासाठी बऱ्याच जाचक अटींचा सामना करावा लागत आहे. त्या अनुशषंगाने नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांना विनंती करून त्यांच्या दालनात तातडीची बैठक लावून घेतली.

या बैठकीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, DTE चे संचालक विनोद मोहितकर हे सुद्धा उपस्थित होते. या बैठकीत मंत्री महोदयांनी सूचना दिल्याप्रमाणे AICTE च्या रुल बुकनुसार 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून BBA, BCA हया अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांना संस्थेची जमीन, बांधकाम व इतर सोय सुविधा नव्याने लागू होणार नाही. परंतु यानंतर नव्याने हे अभ्यासक्रम सुरू करताना AICTE च्या नियमानुसार महाविद्यालयांना जमीन, बांधकाम व इतर सोय सुविधा लागू राहतील. तसेच या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता लवकरात लवकर प्रक्रिया सुरळीत पार पाडली जाईल, असे निर्देश नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.