४ एप्रिल २०२२ ला होणाऱ्या जनआक्रोश मोर्चाच्या तयारीकरिता भाजपची २९ मार्चला बैठक

50

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये ४ एप्रिल २०२२ रोजी होणाऱ्या जनआक्रोश मोर्चाच्या तयारीकरिता गडचिरोली शहरातील व गडचिरोली तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी तसेच सर्व भाजप आघाड्यांचे पदाधिकारी व शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व बुथ समिती सदस्य यांची बैठक खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आमदार डॉ. देवराव होळी, संयोजक जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता फंक्शन हॉल चामोर्शी रोड गडचिरोली येथे संपन्न होणार आहे.
तरी गडचिरोली शहरातील तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गडचिरोली तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे व शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांनी केले आहे.