देशाच्या विकासात महिलांचे योगदान कौतुकास्पद : भारतीय मानवाधिकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश मोकाशी यांचे प्रतिपादन

131

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आज सर्वच क्षेत्रात महिला पुढे आहेत. पुरूषांच्या बरोबरीने एक पाहुल पुढे टाकत महिलांचा देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. अशा महिलांचा सन्मान करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भारतीय मानवाधिकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश मोकाशी यांनी केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार 13 मार्चला प्रेस क्लब भवनात आयोजित ‘जिवन सन्मान पुरस्कार’ कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांना सन्मानित करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश मोकाशी तर प्रमुख अतिथी म्हणून श्री गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, भारतीय मानवाधिकार परिषदेचे संस्थापक संचालिका प्रिती मोकाशी,  प्रा. डॉ. सविता सादमवार, माजी प्राचार्य पंडित पुडके, ऍड. कविता मोहोरकर आदी उपस्थित होते. जिवन सन्मान कार्यक्रमात टॅक्सी चालक किरण कुरमावार, ऍड कविता मोहोरकर, आधार विश्वफाऊंडेशनच्या अध्यक्षा गीता हिंगे (पोरेड्डीवार), माजी नगराध्यक्षा योगीता पिपरे, महिला बालकल्याण समिती अध्यक्षा प्रा. डाॅ. सविता सादमवार, परिचारिका मेरी बेलेरिना विल्सन, स्वर्ण कन्या एंजल देवकुले, कराटे पटू गौरी सालोटकर, डॉ. माधुरी किलनाके, डॉ. छाया उईके, डॉ. अंजली साखरे, परिचारिका कविता नांदगाये, सना शेख, सफाई कामगार अनिता मोगरे, चंदा रनशुर, प्रियंका चिंचोलकर, महिला समुपदेशिका वैशाली गेडाम (बांबोळे), ऍड. स्नेहा मेश्राम, पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी देशमुख, पोलिस उपनिरिक्षक वर्षा नैताम, महिला पोलिस शिपाई वर्षा बहिरवार, शांता कुळसंगे, सविता डोमळे आदी महिलांचा जीवन सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन हिना मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक प्रिती मोकाशी यांनी तर आभार भारतीय मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ता मोहन ठाकरे, मंगेश कामडी, विवेक मून, आशिष भरणे आदिंनी सहकार्य केले.