शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांंवर गुन्हा दाखल करा : आमदार डॉ. देवराव होळी

124

– शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

– मोर्चास गडचिरोली व धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

गडचिरोली : शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्रित येऊन सरकार स्थापन करित असल्याचा गवगवा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने गोरगरिब शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना संकटात टाकणारे सरकार असल्याचे प्रतिपादन करीत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या राज्य सरकारवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित शेतकरी मोर्चास मार्गदर्शन करताना केले.
मोर्चाला भाजपा जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तथा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष योगिताताई भांडेकर, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती रंजिताताई कोडाप, अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पंचायत समितीचे सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, भाजपा तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, धानोरा तालुका प्रभारी अनिल पोहनकर, गडचिरोली तालुका संपर्क प्रमुख विलास पाटील भांडेकर, पं. स. सदस्य शंकर नैताम, नगरसेविका अल्काताई पोहनकर, नगरसेवक केशव निंबोळ, भाजपा नेत्या प्रतिभाताई चौधरी, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, लोमेश कोलते, अनिल करपे, निलिमाताई राऊत, बंडूजी झाडे, तालुक्यातील सरपंच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषणा केली मात्र अजूनही अनेक असंख्य शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी धानाला बोनस जाहीर केला व तो नियमित दिला. माञ आघाडी सरकारने बोनस देण्यास नकार दिला आहे. धडक सिंचन विहीर योजनेतील विहिरींच्या बांधकामाचा निधी उपलब्ध करून दिला नाही. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी त्रस्त आहे. मात्र त्यांना कोणतीही आर्थिक मदत नाही. शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा विद्युत पुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित करण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी सर्व गरजूंना घरकूल देण्याचे घोषीत केले आहे. मात्र घरकुल लाभार्थ्यांच्या प्रपत्र “ड” च्या यादीचे चुकीचे निरीक्षण करून अनेक गरजूंना घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवण्यातचे काम या सरकारने केले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य लोकांच्या जीवावर उठले असून या सरकारला जागे करण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी दिली. मोर्चातील या मागण्या लवकरात लवकर शासनाने मान्य न केल्यास शासनाच्या विरोधात आणखी मोठा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मोर्चाला प्रा. रमेश बारसागडे, योगिताताई भांडेकर, प्रकाश गेडाम, मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास दशमुखे यांनीही मार्गदर्शन केले.