गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार बाबुरावजी मडावी यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत आज विविध कार्यक्रमांंचे आयोजन

108

गडचिरोली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशन, आदिवासी हलबा हलबी कर्मचारी महासंघ आणि नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन नारी शक्ती गडचिरोली व आदिवासी विविध संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार तथा जनमानसाचे कैवारी व आदिवासींंचे हृदयसम्राट बाबुरावजी मडावी यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे आज, 27 नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांंचे आयोजन करण्यात आले आहेत. सकाळी 9 वाजता स्व. बाबुरावजी मडावी चौक धानोरा रोड गडचिरोली येथे कैलासवासी बाबुरावजी मडावी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व संविधान प्रस्ताविकाचे वाचन, त्यानंतर लगेच सकाळी 10 वाजता जंगल कामगार सोसायटी धानोरा रोड गडचिरोली येथे प्रतिमेचे पूजन व व कैलासवासी बाबुरावजी मडावी यांच्या जीवन कार्य, व्यक्तिमत्व आणि त्यांचे समाजाप्रती योगदान याबाबत विविध मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच याच कार्यक्रमात कैलासवासी बाबुरावजी मडावी यांचा पुतळा उभारण्याच्या संबंधाने स्मारक समिती गठीत करावयाची आहे. तरी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी सदर कार्यक्रमांंना बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सर्वश्री घनश्याम मडावी, फरेंद्र कुत्तीरकर, भरत येरमे, श्रीमती रंजिता कोडापे, गुलाबराव मडावी, माधवराव गावड, सदानंद ताराम, अमरसिंग गेडाम, आनंद कंगाले, कैलास मडावी, डॉ. हेमराज मसराम, विनायक कोडापे, देवराव अलाम, जयश्री येरमे, वर्षा शेडमाके यांनी केले आहे.