शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळाला नाही किंवा तुटपुंजी मदत मिळाली तर उपोषण करणार : खासदार अशोक नेते

110

– खासदार अशोकजी नेते पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

– सावली तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी

गडचिरोली : गेल्या 8 दिवसात सावली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले आहे. वरच्या पावसामुळे हातात आलेले पीक गेले असले तरी शेतकऱ्यांनी खचुन जाऊ नये, असा धीर देत शेतकर्‍यांच्या कोणत्याही परिस्थितीत मदत मिळवुन देणार, असा विश्वास गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी दिला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण वर्षभराचे आर्थिक तथा अन्नाचं बजेट कोलमडले आहे. गुरे-ढोरांचा चारा सुद्धा मिळणारं नाही. सावली तालुक्यात जवळपास 35 ते 40 गावांमध्ये अतिशय पाऊसाची सतत धार सुरु होती. त्यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांची ही व्यथा जाणून घेण्यासाठी व त्यांना धिर देण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी 13 ते 14 गावांना आज भेटी दिल्या.

थेट शेतकर्‍यांच्या बांधावर शेतकऱ्यांची आर्त हाक

अंतरगाव येथील 72 वर्षीय शेतकरी वसंत तरारे यांनी खासदार अशोकजी नेते यांना नुकसान झालेल्या धान पिकाची कळपी दाखवून आपली व्यथा मांडली. आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहो. या पिकातून काहीच हाती लागणार नाही. त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी, अशी मागणी खासदार अशोकजी नेते यांना केली.
सावली तालुक्यात नुकसान झालेल्या उसेगाव, हरांबा, रुद्रापुर, कवठी, निमगाव, अंतरगाव, निफंद्रा, मंगरमेंढा, पालेबारसा, सायखेडा येथे थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन खासदार अशोकजी नेते यांनी पाहणी केली.
यावेळी अविनाश पाल जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी तथा तालुकाध्यक्ष, सतिशभाऊ बोम्मावार तालुका महामंत्री, दिवाकर गेडाम, विनोद धोटे युवा अध्यक्ष, विशाल करंडे युवा जिल्हाउपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, शेतकरी बांधव व प्रशासनाचे अधिकारी बांधावर उपस्थित होते.