माजी जि.  प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

66

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २५ डिसेंबर २०२२ : अहेरी तालुक्यातील देवलमारी ग्रामपंचायत येथे न्यू स्टार व्हॉलीबॉल मंडळ देवलमारी यांच्या वतीने भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून तर दुसरा पारितोषिक माजी आमदार दीपकदादा आत्राम व तिसरा पारितोषिक ग्रामपंचायत देवलमारी असे तीन पुरस्कार या स्पर्धेच्या विजेता संघाला देण्यात येणार आहे. आज सदर स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंचावर श्री. लक्ष्मण कनाके सरपंच देवलमारी, श्री. हरीश गावळे उपसरपंच देवलमारी, महेश लेकूर सदस्य, लक्ष्मण आत्राम सदस्य, सलय्या कंबलवार सदस्य, विमला कुर्री सदस्य, शशिकला मोहंदा सदस्य, संजूबाई आत्राम सदस्य, रीमा मडावी सदस्य, मोनिका तोकला सदस्य, पेंटूबाई पोरतेट माजी सरपंच, सुरेश गुंडावार माजी उपसरपंच, विनोद वरगटीवार, प्रभाकर वरगनटीवार, सुरेश तोकला, सभय्या तोकला, विनोद रामटेके व गावातील महिला पुरुष उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश तोकला, उपाध्यक्ष श्री. सुधाकर लेकूर, सचिव गणेश गदासवार, सहसचिव सुधीर भामनकर, कोषाध्यक्ष संजय गोंडे खेळाडू उपस्थित होते.