चामोर्शी व घोट येथील जि. प. माध्यमिक शाळांच्या ११ वी, १२ वीच्या अतिरिक्त तुकड्यांना मान्यता द्या

94

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची विधानसभेत मागणी

– जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना वर्गखोल्या मंजूर करून बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २२ डिसेंबर २०२२ : गडचिरोली हा मागास जिल्हा असून या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांची दयनीय अवस्था आहे. येथील जिल्हा परिषदांच्या शाळांना चांगल्या वर्गखोल्या नाहीत. येथील बहुतांश हायस्कूलला वर्ग ११ व १२ वीच्या तुकड्या जोडलेल्या नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत पैसे मोजून शिक्षण घ्यावे लागते. त्यामुळे ज्या ठिकाणी वर्ग ११ व १२ वीच्या तुकड्या उपलब्ध आहेत, अशा चामोर्शी व घोट येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळांच्या ११ वी, १२ वीच्या अतिरिक्त तुकड्यांना मान्यता द्यावी, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी विधानसभेत ग्रामविकास मंत्री नामदार गिरीशजी महाजन यांच्याकडे प्रश्नोत्तराच्या कालावधीमध्ये केली.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांच्या बांधकामांची आवश्यकता असून या वर्ग खोल्या मंजुर करून खोल्यांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी यावेळी केली.