मविआ सरकारने पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करून जनसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची केली मागणी

111

– भारतीय जनता पार्टी देसाईगंजच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

गडचिरोली : दिवाळीच्या पर्वावर जनसामान्यांना दिलासा मिळावा याकरिता देशातील मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी केले. प्रति लिटर पेट्रोलच्या मागे ५ रुपये व प्रति लिटर डिझेलच्या मागे १० रुपये कपात करून जनसामान्य जनतेला दिलासा दिला. यामुळे महाराष्ट्रातही पेट्रोल ६ रुपये व डिझेल १२ रुपयांनी स्वस्त झाले. केंद्र सरकारच्या पाठोपाठ इतर भाजपा शासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील राज्याचा करात कपात केली. मात्र महाराष्ट्रातील ठाकरे सरकाने अजून राज्याच्या कर दरात कपात केलेली नाही. राज्यात डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारला जातो तर पेट्रोल २५ टक्के व्हॅट आकारला जातो. सोबतच पेट्रोल प्रतिलिटर ९ रुपये असेही आहे. यामध्ये दुष्काळासाठी प्रतिलिटर ३ रुपये सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला डिझेल व पेट्रोल व करापोटी ३० ते ४० रुपये प्रति लिटर मिळतात. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने ही पेट्रोल, डिझेलवरील कर दरात कपात करावी, यासाठी मोतीलालजी कुकरेजा उपाध्यक्ष नगरपरिषद देसाईगंज यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा देसाईगंजच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यात इंधनावर राज्य सरकारने कर कमी करून जनतेला दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी शालुताई दंडवते न. प. अध्यक्ष, रोषणीताई पारधी जि. प. सभापती, रेवताताई अलोणे सभापती पं. स. वडसा, अर्चनाताई ढोरे उपसभापती पं. स. वडसा, सुनिल पारधी भा.ज.पा. ओबीसी जिल्हाध्यक्ष, योगेश नाकतोडे, देविदास ठाकरे, लालाजी रामटेके, अन्नाजी तुपट, श्यामरावजी अलोणे, चैतनदास विधाते, ध्नजय तिरपुडे, गौरव नागपुरकर, पंढरीजी नखाते, उमेश ढोरे, रामचंद्र ठाकरे, विनु नाकाडे, अजय तितिरमारे, दादाजी नाकतोडे, कविता बारसागडे, शेषराव नागमोती, केवळरामजी झोडे, भागवत मेश्राम, सचिन वानखेडे, सचिन खरकाटे, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.