भाजपा गडचिरोली विधानसभा मतदार संघाच्या वतीने पेट्रोल- डिझेल भाववाढ कमी करण्यासाठी महविकास आघाडी सरकार विरोधात चामोर्शी येथे केले तीव्र आंदोलन

82

– आंदोलनाचा धसका घेत तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी येऊन स्वीकारले निवेदन

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या आधी पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. मोदी सरकारने ज्याप्रकारे पेट्रोल – डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी भाजपा तालुका चामोर्शीच्या वतीने केली आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल – डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली होती. या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. आता मोदी सरकारने पेट्रोल – डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर आघाडी सरकारनेही कर कपात करून आपल्या वतीने अधिक मदत केली पाहिजे, ही जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. तथापि, अजूनही आघाडी सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने आघाडीतील घटक पक्षांची आंदोलने म्हणजे केवळ राजकीय मतलबीपणा होता हे स्पष्ट झाले आहे. देशातील एकूण २२ राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या करात कपात करून पेट्रोल – डिझेलच्या दरात अधिकची सवलत दिली आहे. महाराष्ट्र राज्याने मात्र अद्याप सवलत दिलेली नाही, त्याविरोधात भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार डॉ. होळी यांचे पुढाकाराने १२ नोव्हेंबरला चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेट चौक येथे आंदोलन आयोजीत करण्यात आले होते. या आंदोलनाचा धसका घेऊन चामोर्शीचे तहसीलदार शिक्तोडे यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रतीक राठी यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांचाही जाहीर निषेध करण्यात आला. जोरदार नारेबाजी करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने भाजप प्र. का. सदस्य स्वप्नीलभाऊ वरघंटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष आनंदभाऊ गण्यारपवार , भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, तालुका महामंत्री साईनाथभाऊ बुरांडे, भाजपा बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ शहा, भाजप न.प. गटनेते प्रशांत येगलोपवार, युवा नेते प्रतीक राठी, रामचंद्र वरवाडे, विलास सावकार चरडूके, जयराम चलाख,  लोमेश सातपुते, मादगी समाज प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण रामटेके, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीव्र आंदोलन व निदर्शने केले.