पोटेगाव आश्रमशाळेत महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी

56

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली/ ३० नोव्हेंबर २०२२ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव येथे सोमवारला महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर होते. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षक डॉ. एस. डी. गोटमवार, के. पी. मेश्राम, ज्येष्ठ प्राथमिक शिक्षक व्ही. एस. कापसे, व्ही. एम. नैताम, व्ही. एस. देसू , एन. पी. नेवारे, चुन्नीलाल पारधी, जयश्री रामगीरवार, अधीक्षक एस. आर. जाधव, अधीक्षिका एल. आर. शंभरकर, संगणक शिक्षक रजत बारई, सांगात संस्थेच्या समुपदेशक वैभवी देव्हारे आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमधून मनीषा पोटावी, क्रिश नरोटे यांनी मनोगत व्यक्त केले.
संचालन व आभारप्रदर्शन ज्येष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत बोधे, विनोद बेहरे, कर्मचारी व विद्यार्थ्यांंनी सहकार्य केले.