गृहकरात केलेली अवाजवी करवाढ कमी करावी : विजय गोरडवार

69

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली/ ३० नोव्हेंबर २०२२ : गडचिरोली शहरात नगर परिषदेने नुक्ताच लागू केलेला गृहकर हा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला असन, ही केलेली करवाढ मागील गृहकराच्या जवळजवळ चारपट आहे. त्यामुळे नागरिकांना धक्काच बसण्या सारखा भाग आहे. या आधी गृहकरात इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना गृहकर भरणे आवाक्याच्या बाहेर होणार असल्याने याबाबत नगर परिषदेचे माजी सभपाती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार यांच्यासह शिष्ठमंडळाने दिनांक २९/११/२०२२ रोजी न. प. मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना भेटून चर्चा केली. शहरातील वाढविण्यात आलेला गृहकर तथा अनियमित नाल्यांचा उपसा, शहरातील अनेक वॉर्डातील बंद विजदिवे, त्याच बरोबर शहरातील मुख्य रस्त्यावरील गुरांचा वावर ज्या मुळे अपघातांचा सततचा धोका आणि शहरातील प्रत्येक वॉर्डांत होणारा डुकरांचा त्रास याकडे न. प ने विशेष लक्ष देण्याच्या संबंधाने सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. तसेच वाढलेल्या गृहकराचे संबंधाने उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात नईम शेख, भास्कर निमजे, नागोराव उईके, अमर खंडारे राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष, मल्लय्याजी कालवा, विजय जाधव, खेमदेव हस्ते आदी उपस्थित होते.