खुशाल नेवारे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित

43

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील रांगा येथील तत्कालीन ग्रामसेवक खुशाल नेवारे यांना जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत सन 2017-18 ते 2020-21 या वषीच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गडचिरोली येथील नियोजन भवनात गौरवण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, विशेष अतिथी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) शेखर शेलार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र कणसे, महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी (पंचायत) महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, आरमोरीचे गटविकास अधिकारी हिवगे, ग्रामसेवक युनियनचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, राज्य कार्याध्यक्ष तथा ग्रामसेवक युनियन गडचिरोलीचे सरचिटणीस दामोदर पटले आदी मान्यवर उपस्थित होते.
धानोरा तालुक्यातील रांगी ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक खुशाल नेवारे हे 2017-18 ते 2019-20 या कालावधीत रांगी येथे कार्यरत होते. रांगी येथे कार्यरत असताना सन 2007-08 मध्ये सुद्धा आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते हे उल्लेखनीय. त्यांनी कर्तव्य बजावताना अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले. याशिवाय अनेक लोकांना सढळ हाताने मदत केली. विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला असून गावाच्या वतीने दिवाळीमध्ये नवोदित जोडप्यांच्या स्वागताचा उपक्रमही सुरू केला होता. या कार्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला. या पुरस्काराचे खरे भागिदार रांगी गाव वासिय असल्याचे सांगितले. नेवारे यांनी केलेल्या लोकोपयोगी कार्याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी कणसे यांनी केले. संचालन वासंती देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक युनियनचे गडचिरोली जिल्हा कोषाध्यक्ष खुशाल नेवारे यांनी केले.