घरकूल लाभार्थ्यांना शून्य टक्के रॉयल्टीने रेती उपलब्ध करून देणार : आमदार डॉ. देवरावजी होळी

44

– गिलगाव (जमी.) येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले शून्य टक्के रॉयल्टीचे वितरण

– मोफत रेतीच्या ट्रॅक्टरला झेंडी दाखवून घरकूल लाभार्थ्यांना पोहचता केली रेती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गिलगाव जमीनदारी येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून मोफत रेतीचा लाभ मिळाला असून गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व गरजू घरकुल लाभार्थ्यांना शून्य टक्के दराने मोफत रेतीचा लाभ मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मौजा गिलगाव (जमी.) येथे आज 0 % रॉयल्टीचे वितरण करताना केले. यावेळी त्यांनी शून्य टक्के रॉयल्टीच्या रेती भरलेल्या ट्रॅक्टरला झेंडे दाखवून घरकूल लाभार्थ्यांंकडे रेती पोहचता केली.

यावेळी चामोर्शी भाजपा तालुका भाजपाध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेशजी शहा, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, तालुका मुरखळा मालचे सरपंच भास्करजी बुरे, ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव यांच्यासह पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व घरकूल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी यासाठी आपण वारंवार शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. त्याला यश मिळाले असून लवकरच सर्वच लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.