हृदयसम्राट बाळासाहेबांची विचारधारा ही आत्मबल व नवचैतन्याचा उर्जास्त्रोत : अरविंद कात्रटवार

53

– बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त बेलगाव येथील शेकडो माताभगिनींना वस्त्रभेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचं एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले. त्यांनी आपल्या प्रखर भाषणांतून जनतेला प्रभावित करून आपला मराठी बाणा कायम जोपासला. मा.बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व हे प्रखर होते. त्यांनी शिवसेनेची स्थापना करून मराठी माणसाला एकवटण्याचे कार्य महाराष्ट्रात पार पाडलं. राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर देऊन सेवाभाव जोपासत जनकल्याणाची सेना म्हणून शिवसेनेची ओळख निर्माण केली. त्यामुळे आजही मराठी जनतेमध्ये मा. बाळासाहेबांप्रती आदर कायम आहे. त्यांचे प्रेरणादायी विचार आजच्या युवा पिढीला आणि महाराष्ट्रातील जनतेमध्ये आत्मबल आणि नव चैतन्य निर्माण करणारे आहेत, असे प्रतिपादन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.हिंदु हदयसम्राट मा. बाळसाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या पुढाकाराने गडचिरोली तालुक्यातील मौशिखाब मुरमाड़ी जिल्हा परिषद क्षेत्रातील बेलगाव येथे माताभगिनींंसाठी वस्त्रभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कात्रटवार यांच्या हस्ते शेकडो माताभगिनींना वस्त्रभेट देण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी बाणा आणि त्यांनी महाराष्टासाठी दिलेले योगदान मराठी माणूस कधीही विसरणार नाही. मुखातून मा. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव येताच अंगातील रक्त सळसळते. जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासच माणसाला यशस्वी करत असतो. माणसाचे आत्मबल नेहमी मजबूत असणे आवश्यक आहे हे त्यांनी आपल्या कार्य कर्तुत्वातून दाखवून दिले. कोणती समस्या ही सहजासहजी सुटत नसेल तर संघर्ष व आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय नाही हे शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांना पटवून दिले. जनतेची कोणतीही समस्या असल्यास मदतीसाठी शिवसेना सर्वात पुढे येते. मागील वर्षभरात आंदोलन व प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मौशीखाब –मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्र, अमिर्झा परिसरातील अनेक गावातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न मा. बाळासाहेब ठाकरे यांचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून केला आहे, असे अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले. आपल्या गावातील कोणत्याही समस्या असतील तर त्या माझ्यापुढे मांडा, त्या सोडविण्यासाठी व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन, असेही अरविंदभाऊ कात्रटवार कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले. वस्त्रभेट कार्यक्रमाला माताभगिनींनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शवली होती. याप्रसंगी शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके, संदीप अलबनकर, प्रशांत ठाकुर, संदीप भुरसे, संजय बोबाटे, सचिन निलेकर, मुकेश गुरनुले, सूरज उइके, अमित बानबले, आनंदराव चुधरी, दिलीप चनेकर, ईश्वर लाजुरकर, पूंजीराम चुधरी, भगवान चनेकर, राहुल खेवले, तानाबा दजगये, नानाजी काळबांंधे, राहुल सोरते, स्वप्निल खांडरे, अंबादास मुनघाते, धनेश्वर सुरकर, धानेश्वर फुकेट, सूरज कोलते, निकेश लोहबरे, सूरज शेंडे, विलास देशमुख, सोनू ठाकरे, रविंद्र मिसार, दीपक लाडे, ओम भैसारे, विकास चौधरी, कैलास लाडे, नयन भोयर, गोपाल हजारे, निरंजन लोहबरे, अरुण बरापात्रे, राजू जवाड़े, दिलीप वलादे, अमित उईके, कवदुजी धन्द्रे, राहुल मड़ावी, गणेश दहलाकर, यादवजी चौधरी, जविन कुरुड़कर, विनोद लेनगुरे, वैभव तिवाड़े, हेमंत चुधरी, सुनील करतेस, पूर्ण उन्दिरवाडे, मोतीराम चंद्रगिरि, समीर शेख, सचिन भुसारी, निकेश मड़ावी, सचिन स्लोटे, मधुकर बावने, गणेश ब्रमनवाड़े, सूरज उइके, दयाराम चापले, रमेश चनेकर, मुकरु चांग, तुलशिराम मेश्राम, नीलकंठ दुमने, अजय कंबड़े, चेतन हजारे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.