शेकापच्या मध्यवर्ती समितीची दोन दिवशीय बैठक गडचिरोलीत

72

– सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेते सहभागी होणार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समीतीची (केंद्रीय कमीटी) बैठक गडचिरोली येथे होणार आहे. या बैठकीला शेतकरी कामगार पक्षाचे दिडशेहून अधिक नेते राज्यभरातून सहभागी होणार असून पक्ष विस्तार व पक्षाच्या जनसंघटना बांधणी, सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर सत्यशोधकी विवेचन तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकांकरीता नियोजन आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवरील जनसंघर्षाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

गडचिरोलीत हाॅटेल लेक व्ह्यू येथे २६ व २७ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या दोन दिवशीय मध्यवर्ती समिती बैठकीला पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार भाई बाळाराम पाटील, आमदार शामसुंदर शिंदे, माजी राज्यमंत्री श्रीमती मिनाक्षीताई पाटील, राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षा सुप्रियाताई पाटील, पुरोगामी महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष आशाताई शिंदे, पुरोगामी युवक संघटने राज्याध्यक्ष भाई बाबासाहेब देशमुख,माजी आमदार संपतबापू पवार पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार पंडीतशेट पाटील, माजी आमदार विवेकानंद पाटील, प्रा. एस. व्ही. जाधव, कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, राहुल देशमुख, काकासाहेब शिंदे, प्रा. उमाकांत राठोड, चंद्रकांत चव्हाण, बाबासाहेब कारंडे, रामदास जराते, शर्मीला हांडे, चित्रलेखा पाटील, चित्राताई गोळेगावकर यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे जिल्हा चिटणीस आणि शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य सहभागी होणार आहेत.

गडचिरोलीत प्रथमच होत असलेल्या या मध्यवर्ती समिती बैठकीनिमित्ताने रविवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात भव्य निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांना पेंशन आणि धानाला साडेतीन हजार रुपये हमीभाव मिळावा, ओबीसींना आरक्षण देण्यासाठी घटनात्मक सुधारणा विधेयक मंजूर करावे, ढिवर समाजाला घरकुल योजना, कोसारान व तलावांचे मालकी हक्क मिळावेत, श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची मासिक मदत तीन हजार करुन तीचा नियमित लाभ द्या, फुटपाथ धारकांना शासनाच्या विविध विभागांच्या जागांवर दुकानगाळे बांधून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासह जिल्ह्यातील विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी उहापोह करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षात अनेकांचे पक्षप्रवेशही होणार आहे. त्यामुळे कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर व दलीत, आदिवासी, भटके विमुक्त आणि ओबीसींच्या हक्क आणि अधिकारांसाठी रस्त्यावरचा संघर्ष राज्याच्या विधिमंडळात अभ्यास पूर्णपणे मांडून सरकारला जनहिताचे विविध कायदे करण्यास बाध्य करणाऱ्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या भव्य निर्धार सभेला जिल्ह्यातील दलीत, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी आणि शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार तसेच फुटपाथ धारक दुकानदार, बेरोजगार, विद्यार्थी, युवक – युवती आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस भाई संजय दुधबळे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, सुधाकर आभारे, रमेश चौखुंडे, चंद्रकांत भोयर, अशोक किरंगे, दामोदर रोहनकर, गंगाधर बोमनवार, महागू पिपरे, किसन साखरे, तुकाराम गेडाम, बाजीराव आत्राम, सत्तू गावळे, देविदास मडावी, पुलखलच्या सरपंच सावित्रीबाई गेडाम, गुरवळाच्या सरपंच दर्शनाताई भोपये, विलास अडेंगवार, प्रदिप आभारे, कविता ठाकरे, डंबाजी भोयर, रामकृष्ण धोटे, पांडुरंग गव्हारे, देवेंद्र भोयर, रेवनाथ मेश्राम, डॉ. भाऊराव चौधरी, भैय्याजी कुनघाडकर, गजानन आभारे, अशोक ठाकूर, बाळू कुसराम, प्रदिप भाकरे, प्रभाकर पोरटे, देवराव शेंडे, मारोती आग्रे, तुळशिदास भैसारे, रवि कंकलवार, उत्तम भोयर, माणिक गावळे, हरिदास सिडाम, जीवन गेडाम, रामचंद्र साखरे, ईश्वर गेडाम विलास मुनघाटे,नरेश कोहपरे, दामोधर चुधरी, मधुकर जल्लेवार, हिरामण तुलावी, भीमदेव मानकर आणि पदाधिकारी यांनी केले आहे.