शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाची ताकद गावागावात बळकट करा : शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री. अरविंदभाऊ कात्रटवार यांचे प्रतिपादन

79

– गडचिरोली तालुक्यातील मौशिखांंब-मुरमाड़ी जिल्हा परिषद क्षेत्रातील शिवसैनिकांचे स्नेहमिलन “गुरूमठ” अमिर्झा या पावनस्थळी संपन्न

– शिवसैनिकांंना मिठाई व भेटवस्तू देवून शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांंनी वाटला प्रेमाचा गोड़वा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शिवसेनेचा जन्म संघर्षातून झाला आहे. हिंदु हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी लढवय्या बाणा जोपासून शिवसेना निर्माण केली. मा. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतिक आहे. कितीही संकटे आली तरी कट्टर शिवसैनिक हा घाबरणारा नसून तो लढणारा आहे. संकटाचा सामना संघर्ष व एकजुटीने करा, असा मुलमंत्र मा. बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांना दिला. मा. बाळासाहेबां प्रती असलेली निष्ठा व प्रेम कायम ठेवून मा. उध्दव बाळसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद गावागावत बळकट करा, असे प्रतिपादन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले. दिपावलीच्या पावन पर्वावर अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या पुढाकाराने गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील शिवसैनिकांचा स्नेहमिलनाचा सोहळा अमिर्झा येथील ‘गुरूमठ’ या पावनस्थळी पार पडला. यावेळी शिवसैनिकांना संबोधीत करताना अरविंदभाऊ कात्रटवार बोलत होते. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार शिवसैनिकांना संबोधीत करतांना पुढे म्हणाले की, शिवसेना प्रमुख मा. बाळसाहेब ठाकरे यांनी ज्यांना मायेची ऊब दिली आणि मोठया पदापर्यंत पोहचविले त्यांनी उध्दव ठाकरे साहेब यांच्याशी दगाबाजी करून आपला वेगळा संसार थाटला आहे. त्यांना राज्याच्या विकासाची व जनतेची काळजी नसून ते केवळ मोह, मायेत अकडले आहेत. यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अद्यापही काही भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांंच्या धानाला योग्य हमीभाव दिला जात नाही. शेतकरी अनेक संकटाचा सामना करीत आहे. परंतू संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना स्थैर्य देण्याचे काम राज्यातील सरकार करीत नसल्याचे अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले. आता आपल्याला नव्या दमाने उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना निर्माण करायची आहे. शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श जोपासून वाटचाल करायची आहे. लवकच जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनची मशाल पेटवायची असून विकासापासून वंचीत असलेल्या भागातील अंधार दूर करायचा आहे. त्यामुळे मा. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणुन आपल्याला लढायचे असून निवडणूकीत भगवी पताका फडकावयाची आहे. यासाठी सर्वांनी एकजुटीने ताकद बनून काम करावे, असे आवाहन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार शिवसैनिकांना म्हणाले.याप्रसंगीशिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादवजी लोहंकबरे, नवनाथ ऊके, संदीप अलबनकर, प्रशांत ठाकुर, संदीप भुरसे, संजय बोबाटे, सचिन निलेकर, मुकेश गुरनुले, सूरज उइके, अमित बानबले, आनंदराव चुधरी, दिलीप चनेकर, ईश्वर लाजुरकर, पूंजीराम चुधरी, भगवान चनेकर, राहुल खेवले, तानाबा दाजगाये, नानाजी काळबंधे, राहुल सोरते, स्वप्निल खांडरे, अंबादास मुनघाटे, धनेश्वर सुरकर, धानेश्वर फुकेट, सूरज कोलते, निकेश लोहबरे, सूरज शेंडे, विलास देशमुख, सोनू ठाकरे, रविंद्र मिसार, निरंजन लोहबरे, जगन चापडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोगरकर, रूमान भांडेकर, विलास नैताम, दिलीप वलादे, अमित उईके, कवदुजी धन्द्रे, राहुल मड़ावी, गणेश दहलाकर, यादवजी चौधरी, जविन कुरुड़कर, विनोद लेनगुरे, वैभव तिवाड़े, हेमंत चुधरी, सुनील करतेस, पूर्ण उन्दिरवाडे, मोतीराम चंद्रगिरि, समीर शेख, सचिन भुसारी, मुकेश आवारी, मुरारी धोटे, भूषण गुरुकार, चंद्रभान कोमलवार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.