चामोर्शी तालुका सेवा सहकारी खरेदी विक्री संघाची (मर्या.) निवडणूक रद्द करा : नगरसेवक आशीषभाऊ पिपरे

51

– तालुक्यातील शेकडो मतदारांची नावे कारण नसताना मतदार यादीतून वगळले

– मनमर्जी कारभाराने निवडक मतदारांना मतदार यादीत स्थान

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी येथील तालुका सेवा सहकारी खरेदी विक्री संघाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुकीला स्थगिती देऊन निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात येऊन नव्याने मतदार यादीची फेररचना करून हेतूुपुरस्पर वगळण्यात आलेल्या सर्व भागधारकांना समाविष्ट होण्याची संधी देण्यात यावी. कारण गेल्या अनेक वर्षांपासून सेवा सहकारी खरेदी विक्री संघ संस्थेत भागधारक असलेल्या शेकडो सभासदांना वगळून ज्यांच्या नावाने सातबारा नाही अश्या लोकांची व विशिष्ट गटाच्या लोकांची नावे तालुका सेवा सहकारी खरेदी विक्री संघाच्या मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वगळण्यात आलेल्या सर्व भागधारकांवर खूप मोठा अन्याय झाला आहे. यामुळे मतदार यादीत समावेश नसलेल्या भागधारक सभासदात खूप मोठा असंतोष पसरला आहे. तालुका सेवा सहकारी खरेदी विक्री संघाचा सभासद असूनही वार्षिक आमसभेची नोटीस न देता परस्पर सभासदांना डावलून सातबारा नसलेल्या भूमिहीन लोकांना तालुका खरेदी विक्री संघाचा मतदार यादीत जाणूनबुजून नाव समाविष्ट करणाऱ्या
व्यवस्थापकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी येथील नगरसेवक आशीषभाऊ पिपरे, त्रियुगी महाराज दुबे, अशोक धोडरे, बाबुराव कुकडे व येथील सर्व शेतकरी यांनी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी प्रामुख्याने सोशल मीडिया प्रमुख रमेश अधिकारी, भागधारक पत्रू दुधबावरे, सुमनबाई दुधबावरे, एकनाथ वासेकर, अरुण पिपरे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.