– टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला पळविल्याचा निषेध
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : वेदांता फॉक्सकॉन, मरीन अकॅडमी, बल्क ड्रग पार्क, मेडीकल डिव्हाईस पार्क हे सर्व मोठे उद्योग महाराष्ट्राबाहेर गुजरातला हलविल्यानंतर पुन्हा टाटा एअर बस प्रकल्प देखील पळविण्यात आल्यायाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष लीलाधर भरडकर यांंच्या नेतृत्वाखाली निदर्शन इंदिरा गाधी चौक गडचिरोली येथे करण्यात आले.
महाराष्ट्र हे उद्योग व्यवसायात देशात प्रगत असलेले राज्य अशी ओळख संपूर्ण देशात आहे. गेल्या ६० वर्षात अनेक मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्रात आले कारण आपल्या राज्यातील वातावरण उद्योगधंद्याकरीता पुरक असल्याचे परकीय गुंतवणुकदारांना सुध्दा वाटते. परंतु गेल्या ४ महिन्यामध्ये अनेक मोठे प्रकल्प आपल्या राज्यातुन निघुन जात असल्याने निदर्शनास येते. यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे वेदांता फॉक्सकॉन ज्या प्रकल्पामध्ये लाखो बेरोजगारांना रोजगाराची संधी होऊ शकली असती, तो प्रकल्प मंजुर होऊन त्यासाठी जागा सुध्दा निश्चीत झाली होती. तो प्रकल्प अचानक गुजरातला जाणे महाराष्ट्रातील युवकांसाठी क्लेषदायक आहे. महाराष्ट्र राज्यातील लाखो युवक यामुळे रोजगारापासून वंचित रााहिले. तसेच त्यानंतर अनेक छोटे-मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याने दिसते. त्यामध्ये टाटा एअरबस हा प्रकल्प २२ हजार करोड रुपयांचा सुध्दा महाराष्ट्रातून गुजरातला मंजुर झाला. हजारो तरुण ज्या प्रकल्पामध्ये रोजगाराची संधी शोधत होते. परंतु महाराष्ट्र सरकारच्या नाकतेंपणामुळे तो प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटुन गेला. याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. स्थानिक इंदीरा गांधी चौक येथे केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिंदे-फडणवीस सरकारच प्रकल्प परराज्यात नेण्यास जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, राकॉ. उपाध्यक्ष योगेश नांदगाये, शहर कार्याध्यक्ष कपील बागडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, फहीम काझी, जिल्हा सचिव आकाश पगाडे, जिल्हा संघटक रंजीत रामटेके, शहराध्यक्ष अमोल कुळमेथे, कार्याध्यक्ष हीमांशू खरवडे, तालुकाध्यक्ष श्रीधर येरावार, संकेत जनगणवार, अंकुश झरली आदी उपस्थित होते.