स्व. बाबुराव मडावी, बिरसा मुंडा जयंती भव्य प्रमाणात साजरी करणार

103

– आदिवासी संघटनांच्या वतीने करण्यात आले विचार विनीमय

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था गडचिरोली संस्थेच्या सभागृहात गडचिरोली जिल्हा निर्मितीचे शिल्पकार स्व. बाबुराव मडावी आणि भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्याकरता नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ उपाध्यक्ष घनश्याम मडावी, स्व. बाबूरावजी मडावी स्मारक समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक गुलाबराव मडावी, ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनचे सदानंद ताराम, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ सचिव कैलास मडावी, स्व. बाबुरावजी मडावी स्मारक समितीचे सचिव अमरसिंग गेडाम, कोषाध्यक्ष देवराव अलाम, राकेश चांदेकर, विठ्ठलराव गेडाम, महिला आघाडी अध्यक्षा वर्षा शेडमाके, निवास कोडापे, ऋषी होळी आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी विविध विषयांंवर विचारविनीमय करण्यात आला. कार्यक्रम दोन सत्रात करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.