चामोर्शी शहरात भव्य ईको पार्क होणार : नगरसेवक आशिष पिपरे यांच्या मागणीला आले यश

68

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी येथे माननीय वनमंत्री लोकनेते नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिली. चामोर्शी शहरात वन विभागाच्या वतीने वन विभागाचे पडीत असलेले व गेल्या अनेक वर्षांपासून सौंदर्यकरणकरिता प्रलंबित असलेल्या वन विभागाचे दुर्लक्षित असलेला बगीचास मूूल व बल्लारपूरप्रमाणे इको पार्कमध्ये परिवर्तन करण्याची मागणी येथील नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी आज मंत्रालय मुंबई येथे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वन विभागाचे बैठकीत पत्राद्वारे केली.

यावेळी त्यांनी सदर गडचिरोली जिल्ह्यातील या नाविण्यपूर्ण मागणीस पुढील कारवाईकरिता संंबंधित वन विभागाचे अधिकारी यांच्याकडे मंजुरीकरिता यांच्याकडे पाठवले व नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार वनमंत्री यांनी चामोर्शी शहरात मूल व बल्लारपूरप्रमाणे भव्य इको पार्क नक्कीच तयार करणार असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक आशीषभाऊ यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात शहराची लोकसंख्या मोठ्या संख्येने वाढली. परंतु शहराचा पाहिजे तसा विकास झाला नाही व शहरात नागरिकांना निवांत क्षणी वेळ घालवण्यासाठी व शहराबाहेर फिरण्यासाठी व नागरिकांच्या मनोरंजनासाठी कोणतेही सुयोग्य बागीच्याचे ठिकाण नाही व कोणत्याही लोकप्रतिनिधी यांनी सदर मागणी करून इको पार्क निर्माण करण्याबाबत पाठपुरावा केला नाही. याबद्दल खंत व्यक्त केली. आज सदर मागणी आज नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांनी मंत्रालय मुंबई येथे वनमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत निवेदन सादर करून लावून धरले व सदर मागणीस वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तत्वतः मंजुरी दिल्याबद्दल त्यांचे चामोर्शी शहरवासीयांच्या वतीने जाहीर आभार मानले जात आहे व नगरसेवक पिपरे यांचेही सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.