लॉयड्स मेटल कंपनीतर्फे तोडसा येथे रोगनिदान शिबिराचे आयोजन

59

– शाळकरी विद्यार्थ्यांंना खेळाचे साहित्य वाटप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत तोडसा येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मा. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता, सरपंच प्रशांंत आत्राम तर लॉयड्स मेटल कंंपनीचे व्यवस्थापक साई कुमार, गणेश शेट्टी, डॉ. गोपाल रॉय, डॉ. सलुजा, बलराम सोमनानी, वेदंश जोशी व लॉयड्स मेटल कंंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे महत्व म्हणजे आपले नागरीक स्वस्थ व निरोगी राहावे. आपण मोठ्या दवाखान्यात जावून उपचार घेवू शकत नाही. म्हणून आपल्याच भागात सर्व नागरिकांंचे उपचार चांंगल्या पध्दतीने व खर्च न करता लॉयड्स मेटल कंपनीतर्फे सर्व उपचार केले जातील. येथे बाहेरुन 16 ते 17 स्पेशालिस्ट डाँक्टर आले आहेत. जर येथे उपचार होत असेल तर येथेच म्हणजे एटापल्ली येथे उपचार करण्यात येईल व जास्त क्रिटीकल उपचार असेल तर कंपनीच्या खर्चाने त्याचा उपचार करण्यात येईल. त्यामुळे सर्वांंनी आपले आरोग्य तपासून घ्यावे व उपचार घ्यावे, असे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांंनी सांंगितले. हा कार्यक्रम शासकीय आश्रमशाळेत घेण्यात आला. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना व्हालीबाल, फुुटबाल, किक्रेट बाल बँट व क्यारम आदी खेळाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.