वन विभागाने तत्काळ वाघास जेरबंद करावे : खासदार अशोकजी नेते

48

– वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत एकलपूर येथे वाघाची दहशत कायम

– वनविभागाचे अधिकारी व एकलपूर या गावातील गावकऱ्यांच्या उपस्थितीत घेतली बैठक

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील काही दिवसांपासून वडसा वनपरिक्षेत्र अंतर्गत एकलपुर येथील या परिसरात वाघाने खूप धुमाकूळ घातला असून या परिसरातील शेतकरी, शेतमजूर, नागरिक यांच्यात वाघाची खूप दहशत निर्माण झाली आहे. वड्सा वनपरिक्षेत्रांतर्गत एकलपूर येथे वाघाची प्रचंड दहशत असून यामध्ये वाघाने अनेक नागरिकांना दर्शन दिले आहे. त्यामुळे गावाच्या परिसरातील जनता भयभीत झालेली आहे.
येथील शेतकरी, शेतमजूर शेतावर जाण्यास नकार देत आहेत. नागरिक सायकल अथवा दुचाकीने जवळच्या गावात जाण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक यांचे शेती वाडीतील कामे ठप्प झाले आहे. यासंबंधीची माहिती प्रदेश संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे यांनी दिली असता तत्काळ या संदर्भाची दखल घेऊन आज एकलपूर येथे गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी भेट देऊन गावातील गावकऱ्यांसोबत चर्चा करून समस्या जाणून घेऊन
नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत भ्रमण ध्वनीवरुन गावातील समस्याबाबत निर्देश दिले व तत्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या वाघाला जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या.

याप्रसंगी खा. अशोकजी नेते यांच्यासोबत आमदार कृष्णाजी गजबे, प्रदेश संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलालजी कुकरेजा, वडसा तालुकाध्यक्ष राजू जेठानी, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी चव्हाण, सरपंचा संध्याताई नागमोती, उपसरपंच संजय सहारे, माजी उपसभापती गोपाल ऊईके, ता. महामंत्री योगेश नागतोडे, उपाध्यक्ष प्रमोद झिलपे, दीपक प्रधान, शेवंता अवसरे पं. स. सदस्य, सारिका रामटेके ग्रा.पं. सदस्या, तसेच पदाधिकारी व गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.