खा. श्री. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात व पुढाकाराने महिला रुग्णालय गडचिरोली येथे रक्तदान शिबिर

70

– देशाचे लाडके पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा सेवा सप्ताह कार्यक्रम निमित्ताने रक्तदान शिबिर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने महिला रुग्णालय येथे मान. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवाडा सेवा सप्ताह कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना व युवकांना मार्गदर्शन करताना या देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे. मा. नरेंद्र मोदीजी देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात, असे प्रतिपादन याप्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी केले.

याप्रसंगी रक्तदान शिबिराच्या निमित्ताने खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, (हेल्थ कार्डचे प्रमाणपत्र) व रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरीत करुन फळेसुद्धा वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपण कार्यक्रमसुध्दा करण्याचे ठरविले.

या कार्यक्रम निमित्ताने खा.अशोकजी नेते, डॉक्टर किलनाके मॅडम यांनी रक्तदात्यांना मार्गदर्शन करुन रक्तदानाचे महत्त्व सांगितले. संचालन जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी खा.अशोकजी नेते गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु. जनजाती मोर्चा, प्रदेश सरचिटणीस (संघटन) भाजपा एसटी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हाध्यक्ष युवा मोर्चाचे चांगदेवजी फाये, विलास पा. भांडेकर संपर्क प्रमुख, विलासजी दशमुखे माजी.उपसभापती, चव्हाण साहेब, डॉक्टर किलनाके मॅडम, योगिताताई पिपरे माजी नगराध्यक्ष, योगिताताई भांडेकर माजी जि.प.अध्यक्ष, वर्षाताई शेडमाके माजी नगरसेविका, लताताई लाटकर न. से., वैष्णवी नैताम न. से, कविताताई उरकुडे, प्रतिभाताई चौधरी, रश्मीताई बाणमारे, वनमालाताई कन्नाके, बंडूजी झाडे, अनिल कुनघाडकर माजी उपाध्यक्ष, मुक्तेश्वर काटवे शहर अध्यक्ष, विवेक बैस, राजु शेरकी, सागर कुमरे शहर अध्यक्ष, अनिल तिडके युवा महामंत्री, हर्षद गेडाम शहर महामंत्री, मधुकर भांडेकर महामंत्री, आशिष कोडाप युवा प्रमुख, आशिष रोहनकर युवा उपाध्यक्ष, पायल कोडापे युवती प्रमुख, पारस राऊत शहर उपाध्यक्ष, धनंजय सहदेवकर, आनंद कुमरे, संजय मांडवगडे, मंगेश रणदिवे, तसेच अनेक भाजपाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.