गणेशोत्सवात युवकांनी केलेले कार्य अभिनंदनीय : विश्व हिंदु परिषद जिल्हा अध्यक्ष वामनरावजी फाये यांचे प्रतिपादन

40

– कुरखेडा सार्वजनिक गणेश सजावट स्पर्धेत युवांगण गणेश मंडळाला प्रथम पुरस्कार

– घरगुती गणेश स्पर्धेत भुवन मारबते प्रथम पुरस्कार

– आदर्श गणेश मंडळ म्हणून खेडेगाव येथील गणेश मंडळ सन्मानित

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून गणेश मंडळातील युवकांनी केलेल्या सामाजिक धार्मिक कार्य अभिनंदनीय असून गणेश उत्सवात केलेल्या सामाजिक धार्मिक कार्यक्रमाची प्रेरणा घेवुन सदोदित कार्य करावे, असे प्रतिपादन विश्व हिंदु परिषद जिल्हा अध्यक्ष तथा कुरखेडा श्रीराम मंदिर अध्यक्ष वामनरावजी फाये यांनी केले.
ते श्रीराम उत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या घरगुती व सार्वजनिक श्री गणेश सजावट स्पर्धाचे बक्षिस वितरण सोहळा कुरखेडा येथे दिनांक १२ सप्टेंबर २०२२ रोज सोमवारला ३ वाजता संस्कार पब्लिक स्कूल सभागृह श्रीराम मंदिर श्रीरामनगर कुरखेडा येथे आयोजित करण्यात आले, या कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दोषहर फाये, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, माजी नगर अध्यक्ष रविद्र गोटेफोडे, नगर पंचायत पाणीपुरवठा सभापती अँड. उमेश वालदे, माजी नगर परिषद सभापती नागेश फाये, श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य लिलाधर बडवाईक, सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष शिवाभाऊ वडीकर, प्रा. रजनी आरेकर, जोत्सना बन्सोड, शिवम बालपांडे, उल्हास देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सार्वजनिक गणेश उत्सव सजावट स्पर्धेत प्रथम पुरस्कार युवांगण गणेश मंडळ कुरखेडा, द्वितीय पुरस्कार राणा नवयुवक मंडळ कुरखेडा, तृतीय गणेश मंडळ नवरगाव तर चतुर्थ पुरस्कार बाल गणेश उत्सव मंडळ शिवाजी चौक कुरखेडा यांना अनुक्रमे ५००१, ३००१ २००१, १००१ रुपये रोख व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. तर घरगुती गणेश सजावट स्पर्धेत प्रथम भुवण मारबते, द्वितीय चेतन बावणे, तृतीय गौरव राठी, चतुर्थ सारंग लांजेवार यांनी पटकविला. त्यांना अनुक्रमे ३००१, २००१, १००१, ५०१ रुपये व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धाचे परिक्षण रविद्र गोटेफोडे तसेच घरगुती गणेश सजावट स्पर्धाचे परिक्षण रजनी आरेकर, जोत्सना बन्सोड यांनी केले. तसेच आदर्श गणेश मंडळ म्हणून खेडेगाव [गेवर्धा] येथील बाल हौशी गणेश मंडळ यांना सन्मानित करण्यात आले. या मंडळाचे अध्यक्ष डाकराम कुमरे, गिरीष गायकवाड, लुकेश गायकवाड, धिरज बांगरे, रामकृष्ण बोरकर, संदिप कुमरे, शिवराज गोबाडे, अंगराज नाकाडे, ललित सुकारे, विकास मडावी, चेतन बावणे आदी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल शोयब पठाण यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रविद्र गोटेफोडे, अँड उमेश वालदे, प्राचार्य बडवाईक, रजनीताई आरेकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम प्रास्तविक चांगदेव फाये, संचालन नरहरी माकडे तर आभार प्रदर्शन नागेश फाये यांनी केले. कार्यक्रमाला सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे प्रशांत हटवार, रोशन कुंभलवार, हर्षल धाबेकर, जगदीश मानकर, साईनाथ कवाडकर, कमलेश दवंडे, डाकराम कुमरे, धिरज बांगरे, रोहीत मनुजा व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेद्र फाये, राहुल गिरडकर, उल्हास देशमुख, अक्षय काळबांधे, मोहन बोदेले, किशोर बन्सोड व श्रीराम उत्सव समिती पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले.