अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त 31 जणांनी केले रक्तदान

53

– प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाळा येथे मा. श्री. अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे आयोजन त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय मोहुर्ली (मो.), भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय मुरखळा माल, तसेच तालुका सहकारी खरेदी विक्री संघ चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी रक्त चढवण्याची आवश्यकता असते. अपघात, रक्तस्त्राव, प्रसवकाळ आणि ऑपरेशन ह्या स्थितींमध्ये रुग्णास अत्यधिक रक्तस्त्राव होण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी रुग्णांना रक्ताची गरज पडत असते. थैलेसिमिया, ल्युकिमिया, हीमोफिलिया यासारख्या विकारांनी पीडित रुग्णांमध्ये वारंवार रक्ताची आवश्यकता पडत असते. रक्तदान हेच जीवनदान, निरोगी व्यक्तिंद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी होतो. अशी सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन मा. श्री. अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवस निमित्ताने रक्तदान शिबिर राबविला गेला.
भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटनप्रसंगी मा. अमोलभाऊ गण्यारपावर नगरसेवक चामोर्शी, सौ. कुंदाताई नरेंद्र जुवारे सरपंच ग्रामपंचायत भेंडाळा, नरेंद्रभाऊ जुवारे सामाजिक कार्यकर्ता, श्रीरंग पाटील म्हशाखेत्री पोलिस पाटील भेंडाळा, सुधीर पाटील शिवणकर सरपंच ग्रामपंचायत मोहूर्ली (मो.), सुनील पाटील कन्नाके सरपंच ग्रामपंचायत सगणापूर, विलास पाटील पोरेड्डीवार सामाजिक कार्यकर्ता, डॉ. साबणे वैद्यकीय अधिकारी भेंडाळा, डॉ. मेश्राम वैद्यकीय अधिकारी मार्कंडादेव हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ढुंमने मुख्याध्यापक त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय मोहोर्ली (मो.), तातावर मुख्याध्यापक भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय मुरखळा माल, पोरटे सचिव खरेदी- विक्री संघ चामोर्शी, सुनील आभारे, सचिन चलकलवार, अभिजित साना, हरिष गेडाम, रमेश शेडमेके, विनायक वासेकर, ज्ञानेश्वर शिंपी, आकाश दुर्गे, गोडसेलवर, निमसरकर, वेलादी, मंगेश हुमने, मंगलभाऊ गुरणुले, चेतन गोर्लावर, संदीप बट्टे, चापले, नरेश मडावी, भारत मडावी, सिकंदर चौधरी, समीर मडावी, सचिन बोमनवर, अनिकेत कुंभरे, वैभव म्हशाखेत्री यांनी सहकार्य  केले.