कौशल्य विकास व उद्योग विकासासाठी निधी उपलब्ध करुन द्या : आमदार डॉ. देवरावजी होळी यांची मंत्री ना. मंगलप्रभातजी लोढा यांच्याकडे मागणी

66

– गडचिरोली जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याची केली विनंती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अनेक युवक, युवती उत्साही लोकांना स्वतःचे व्यवसाय, उद्योग निर्माण करण्याची इच्छा आहे. परंतु त्यांना त्या संदर्भातील शिक्षण ,प्रशिक्षणाच्या अभावामुळे पुढे जाण्यास अडचणी आहेत. अशा इच्छुकांच्या कौशल्य विकास व उद्योग विकासासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार डॉ देवरावजी होळी यांनी राज्याचे कौश्यल्य विकास व उद्योजकता मंत्री ना. मंगलप्रभातजी लोढा यांच्याकडे केली.

यावेळी त्यांनी मुंबई मंत्रालयात मंत्री ना. मंगलप्रभातजी लोढा यांची भेट घेऊन पर्यटन विकासाबाबतही चर्चा केली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे मोरेश्वर कुनघाडकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जिल्ह्यातील युवकांना स्वतःचे व्यवसाय, उद्योग सुरू करता यावे यासाठी त्यांचे कौशल्य शिक्षण, प्रशिक्षणातून वृध्दींगत व्हावे यासाठी निधिची उपलब्धता करुन द्यावी अशी विनंती केली. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा, चपराळा, मुतनुर सह पर्यटन विकासाची संधी असणाऱ्या क्षेत्रासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.