…अन्यथा सुरजागड लोहखनिज प्रकल्पातील एकही ट्रक जावू देणार नाही : माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांचा इशारा

261

– आष्टी, एटापल्ली, आलापल्ली व सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेला भाजप सरकार जबाबदार असल्याची टीका

काँग्रेसच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्याचा दिला इशारा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आष्टी, एटापल्ली, आलापल्ली व सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाची प्रचंंड दुरावस्था झाली आहे. या मार्गाची त्वरित दुुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा सुरजागड लोहखनिज प्रकल्पातील एकही ट्रक जावू देणार नाही, असा इशारा काँँग्रेसचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिला आहे.

आष्टी ते एटापल्ली, आलापल्ली ते सिरोंचा हे  राज्य महामार्ग म्हणुन 2014 पुर्वी सुस्थितीत होते. परंतु 2014 नंतर केंद्रसरकारने या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाच्या यादीत समाविष्ट केले. या मार्गावर आंतरराष्ट्रीय राज्यातुन जड वाहनाची प्रचंड ये-जा असते. तसेच सुरजागड प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध असतानाही पैशाच्या हव्यासापोटी व सुरजागड उद्योग समुहाला लाभ पोहविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन करुन सुरजागड येथील लोह खनिज इतर जिल्हयामध्ये नेण्याचा सपाटा सरु केलेला आहे. या उत्खनन व वाहतुकीवर प्रशासनाचा कुठलाही अंकुश नाही. एका ट्रकमध्ये किती लोहखनिज नेण्यात येत आहे. यासाठी कुठेही धर्म काटयाच्या माध्यमाातून मोजमाप करण्यात येत नाही व किती ट्रकाव्दारे मालवााहतूक व लोहवाहतुकीचे प्रशासनाकडे नोंदणीही नाहीत, जणुकाही उद्योग समुहाला बेधुंद  लुटमार करण्याची मुबा केंद्र व राज्य सरकारातील प्रशासनांनी दिलेली आहे की काय? अशी शंका उपस्थित होत असून सदर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेला भाजप सरकार जबाबदार असल्याची टीका काँग्रेसचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केली आहे.

वास्तविक पाहता, या महामार्गाचे नव्याने बांधणी करण्याचे नियोजन केली असल्याची प्रशासनाकडून माहिती देण्यात येते. परंतु मागील तीन वर्षांंपासुन कामाला सुरवात झालेली नाही. केंद्रातील पंतप्रधान व केंद्रीय वाहतुक मंत्री हे कार्यक्षम असल्याचा दावा भाजपाचे नेते करीत असतात. या भागात भाजपाचे खासदार असताना सुध्दा हे काम रखडलेले असल्याने भाजप खासदार निष्क्रीय आहेत किंवा केंद्रावर दबाब आणण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहेत. यापुर्वी राज्यमहामार्ग असल्याने किरकोळ दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडे निधी असायचा, परंतु जेव्हापासून हे महामार्ग केंद्र सरकारने हस्तांंतरीत केलेले आहे, तेव्हापासून केंद्राकडून किरकोळ दुरुस्तीसाठी निधी दिल्या जात नाही. त्यामुळे जनतेचे अच्छे दिन तर सोडा बुरे दिन सुरु झालेले आहेत. स्वातंत्र्यपुर्व काळात सुध्दा जनतेला सिरोंचाला जाण्यासाठी तेलगांना राज्यातून जावे लागत नव्हते. परंतु केंद्र सरकारने गडचिरोली जिल्हयातील लोकांना पुन्हा स्वातंत्र्यपुर्व काळात नेवून ठेवले. याबाबीची गंभीर दखल घेवून केंद्र सरकारने रस्त्याचे बांधकाम त्वरित सुरु करावे किंवा सुरजागड उद्योग समुहाकडून निधीची मागणी करुन तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी डॉ. उसेंडी यांनी केली आहे.

यावेळी काँँग्रेस पदाधिका-यांनी आष्टी ते एटापल्ली, आलापल्ली ते सिरोंचा रोडची पाहणी केली असता रस्त्याची दयनीय अवस्था दिसून आली. या मार्गाची तत्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे तिव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचाही इशारा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिला आहे.