राजकारणा पलीकडील समाजकारणी नेता महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे

53

(वाढदिवस विशेष)

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राजकारण आणि राजकारणी म्हटलंं तर समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच. बहुतांशी लोकांना राजकारण म्हणजे गलिच्छ आणि ते दुराचारी, भ्रष्ट, स्वार्थी, गुंड्या बदमाश लोकांचे काम असे वाटते. समाजातील प्रत्येकाला राजकारणात एक बदल हवा पण या बदलावाचा भाग कोणी होऊ पाहत नाही. ‘जिजाऊ- शिवाजी जन्मास यावे पण शेजारच्याच्या घरी’ अशी आजच्या समाजाची परिस्थिती झाली आहे. अश्या परिस्थितीत फक्त गडचिरोली जिल्ह्यातच नाही तर किमान महाराष्ट्रात म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही, अशी राजकारणाला नवी दिशा दाखवण्याचे काम करत आहे, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे युवा तडफदार अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे.
भाऊंची आणि माझी ओळखी फार काही जुनी नाही. भाऊंकडे जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे नोव्हेंबर 2021 मध्ये आली. तेव्हापासूनची आमची ओळखी आणि आतापर्यंतचा हा प्रवास. त्यापूर्वी भाऊ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना कोविडच्या काळात केलेले कार्य खरोखर उल्लेखनीय व प्रसंसनीय होते. जिल्ह्यातील सर्व सत्ता सूत्रे हातात असणारे आमदार- खासदार लोकप्रतिनिधी जे कार्य करू शकले नाही त्यापेक्षा चांगले कार्य कोविड काळात या तरुण राजकारण्यांनी करून दाखवले. स्वतः च्या जिवाची पर्वा न करता आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर महेंद्रभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोविड रुग्णालयात केलेले मोफत भोजनदान हे खरोखर वाखाण्याजोगे  होते. त्याचा एक लाभार्थी म्हणजे मी आणि माझ्यासारखे फक्त गडचिरोली जिल्ह्यातील नव्हे तर इतरही जिल्ह्यातून आलेले अनेक कोविड रुग्ण व त्यांचे नातेवाईक होते. इतकेच नाही तर भाऊ जिल्हाध्यक्ष झाल्यापासून मार्कण्डा यात्रेकरिता मोफत बससेवा असेल, आता आलेल्या महाभयंकर पूरपरिस्थीत पूरग्रस्तांना मदतीसाठी मोफत अन्नधान्य किट व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण असेल किंवा मग आरोग्याच्या संदर्भाने मदतीसाठी अर्ध्या रात्री गरजूंचे आलेले फोन कॉल असो सर्वांच्या मनाला समाधान वाटेल असेच कार्य महेंद्रभाऊंंकडून होताना मला दिसले. यातूनच मला त्यांच्यातील राजकारणातून समाजकारण साधणारे खरे राजकारणी दिसून येतो. त्याचप्रमाणे जिल्हयातील एकमेव असलेला हत्तीचे स्थलांतर रोखण्यासाठी केलेले आंदोलन, वेळोवेळी शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसंन्याच्या हितासाठी भाऊंच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्यातील खरा कर्तव्याची जाण असणारा नेता दिसून येतो.
इतकेच नाही तर पक्ष वाढीसाठी चालणारी त्यांची धडपड ही सुद्धा उल्लेखनीय आहे. काँग्रेसची डिजिटल सभासद नोंदणी, नवसंकल्प कार्यशाळा यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून लहानातला लहान कार्यकर्ता असेल तरी सर्वांना सोबत घेऊन चालणे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कुरखेडा ते गडचिरोली अशी 75 किमीची आझादी गौरव पदयात्रा भर पावसातही भिजत त्यांनी यशस्वी करून दाखवली. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यन्त 75 हुन अधिक किलोमीटरचा प्रवास झालेला असताना पक्ष वाढीसाठी करत असलेल्या कार्याचा तेज भाऊंच्या चेहऱ्यावर झळकत होता. हाच तेज, हीच जिद्द पक्षवाढीसाठी व समाज उत्थानाच्या कार्यासाठी भाऊंमध्ये सतत रहावी व त्या माध्यमातून राजकारणाला व इतरही राजकारण्यांना नवी दिशा मिळावी याच शुभेच्छेसह आमचे मार्गदर्शक गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे युवा तडफदार अध्यक्ष महेंद्रभाऊंना वाढदिवसाच्या व दीर्घायुष्याच्या अनेक अनेक शुभेच्छा !

– अनुप कोहळे गडचिरोली