सुरजागड पहाडीवरील उत्खनन केलेले लोहयुक्त दगड व चुरा जड वाहनाने वाहतूक करणे बंद करा

87

– व्यापारी संघटना असोसिएशन आलापल्ली/नागेपल्लीची मागणी

– त्रिवेणी अर्थ मुव्हर्स प्रा. लि. कंपनी / लॉयड मेटल्स कंपनीकडून दिवसरात्र होत आहे 800 ते 1000 जड वाहनांमधून लोहयुक्त दगडांची वाहतूक

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : त्रिवेणी अर्थ मुव्हर्स प्रा. लि. कंपनी /लॉयड मेटल्स कंपनीद्वारे सुरजागड लोहखनिज प्रकल्पामधून जडवाहनाने लोहयुक्त दगड व चुरा दिवसरात्र ८०० ते १००० जड वाहनांनी एटापल्ली – मद्दीगुडम – आलापल्ली – नागेपल्ली या राष्ट्रीय महामार्गावरून केली जात आहे. याचा रस्त्यालगतचे व्यापारी, नागरिक, शाळकरी मुले व वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे सुरजागड पहाडीवरील उत्खनन केलेले लोहयुक्त दगड व चुरा जड वाहनांंनी वाहतूक करणे त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी व्यापारी संघटना असोसिएशन आलापल्ली/ नागेपल्ली यांनी केली आहे.

लोहखनिज वाहतुकीमध्ये अनेक जड वाहन परिवहन खात्याकडून मंजुरीपेक्षा जास्त माल भरून वाहतूक केल्या जात आहे. त्यामुळे मद्दीगुडम – आलापल्ली – नागेपल्ली ते आष्टी पर्यंतच्या परिपूर्ण राज्यमहामार्गावर मोठेमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यातच सर्व लोड, वाहनाचे धूर व्यापारांच्या दुकानात उडतो. त्यामुळे दुकानाचे आतोनात नुकसान होत आहे. रस्त्याच्या आजूबाजूला वास्तव्याची घरे आहेत. अहोरात्र दररोज ८०० ते १००० जड वाहन वाहतूक होत असल्याने शाळाकरी मुलांना तसेच सायकलस्वार, मोटरसायकलस्वार व चारचाकी वाहनधारकांमध्ये वाहन घेऊन जाताना भितीमय वातावरण निर्माण झाले आहे. आलापल्ली व नागेपल्ली या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ४ शाळा, ८ हायस्कूल, ५ महाविद्यालय, १० अंगणवाडी, ३ इंग्रजी माध्यमशाळा आणि १ आय. टी. आय. असून एकूण ५००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदर विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी आलापल्ली ते चंद्रपूर मेन रोड राज्य महामार्गाचा उपयोग करावा लागतो. या खड्डेमेय मार्गावर येे- जा करतानाा जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो. या खड्ड्यामुळे आतापर्यंत एटापल्ली ते आष्टी मार्गावर १० ते १५ अपघात झालेले असून अनेेकदा जिवितहानी झाली आहे. तसेच अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरी सामान्य विद्यार्थी, जनमानसाची जिवित हानी झाल्यास त्याची जबाबदारी कुणाची ? हा प्रश्न आलापल्ली व नागेपल्ली ग्रामस्थांना भेडसावत आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रक नेहमी उभे असतात त्यामुळे सामान्य नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायत आलापल्ली व नागेपल्ली यांनी ग्रामसभा घेऊन कार्यवाही अहवाल प्रस्ताव दिलेला असून यासोबत सहपत्रीत करण्यात येत आहे. तरी सदर कंपनीकडून कार्यवाही अपेक्षित आहे. तक्रारीचे दिनांकापासून १० दिवसाच्या आत आलापल्ली ते नागेपल्ली रोड खड्डेमुक्त करण्यात यावी व जड वाहनांची वाहतूक सकाळी ६ ते रात्रो ९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात यावी किंवा एक वेगळा गावाबाहेरून बायपास रस्ता तयार करण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले आहे. अन्यथा आलापल्ली / नागेपल्ली सर्व ग्रामस्थ सदर कंपनीचे वाहन वाहतूक होवू देणार नाही, असा इशारा देण्यात आली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. याची कंपनी व्यवस्थापक व शासकीय निन्मशासकीय अधिकारी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन व्यापारी संघटना असोशियन आलापल्ली/नागेपल्ली यांनी निवेदनात म्हटले आहे.                                                                                       या संदर्भातील निवेदनासह ग्रामपंचायत कार्यालय आलापल्ली यांचे ठराव पत्र व ग्रामपंचायत कार्यालय नागेपल्ली यांचे ठराव पत्र जोडण्यात आले असून सदर मागणीचे निवेदन मा. राज्यपाल साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महारष्ट्र राज्य, मुंबई, मा. परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. मुख्य सचिव मंत्रालय, मुंबई महाराष्ट्र राज्य सचिव पी.एम.ओ. दिल्ली, मा. मुख्य परिवहन महामंडळ, नागपुर, मा. जिल्हाधिकारी साहेब, गडचिरोली, मा. पोलीस अधीक्षक साहेब, गडचिरोली अधिकारी, गडचिरोली, मा. प्रादेशिक परिवहन, मा. पोलीस उपविभागीय अधिकारी, कार्यालय अहेरी, मा. तहसीलदार तहसिल कार्यालय अहेरी, मा. धर्मरावबाबा आत्राम आमदार साहेब अहेरी विधान सभा,  मा. अशोक नेते खासदार साहेब गडचिरोली, मा. पोलीस निरीक्षक साहेब अहेरी यांंना देण्यात आले आहे. सदर मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आलापल्ली/नागेपल्ली येथील व्यापारी संघटना असोसिएशनने दिला आहे.