तान्हा पोळा महोत्सवामुळे बालगोपालांंमध्ये संस्कृती जोपासण्याचे कार्य : वामनरावजी फाये यांचे प्रतिपादन

54

– कुरखेडा येथील श्रीराम मंदिरात तान्हा पोळा महोत्सव उत्साहात साजरा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : बालगोपालांंमध्ये उत्साह निर्माण करणाऱ्या तान्हापोळा महोत्सवामुळे शेतकरी बांधव व पशुधनाप्रति बांधिलकी निर्माण होत तान्हा पोळा महोत्सवामुळे संस्कृती जोपासण्याचे कार्य निश्चितपणे होत असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदु परिषद जिल्हा अध्यक्ष तथा कुरखेडा श्रीराम मंदिराचे अध्यक्ष वामनरावजी फाये यांनी केले.
ते श्रीराम उत्सव समिती कुरखेडा यांच्या वतीने श्रीराम मंदिर श्रीरामनगर कुरखेडा येथे सार्वजनिक तान्हा पोळा महोत्सव, भव्य वेशभुषा, नंदीबैल सजावट स्पर्धा शनिवार, दि. २७ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
तान्हा पोळा महोत्सावाला बालगोपालांनी व कुरखेडा नगरवासियांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या स्पर्धांंमध्ये पारस झोडे, सोहम बन्सोड, माही साहाळा, त्रिशिका कुथे, निधी टेंभुळकर, राम नागपूरकर, जानवी बोरकर, आदित्य बोदेले, सुशांत गजभिये, गोकुले हरडे, आशय गावंडे, वेदिका भेले, प्रथम गजभे, मितेश पवार, आदींना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. यात विजेत्या स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराज अ गट ८ ते१४ वर्षावरील गटामध्ये प्रथम बक्षिस १११११ रोख व चषक, दितीय बक्षिस ७७७७ व चषक, तृतीय ४४४४ व चषक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर १ ते ७ वर्ष पर्यंतच्या गटात प्रथम ७७७७ रुपये, व्दितीय ४४४४ रुपये, तृतीय 3333 रुपये पुरस्कार देण्यात आले. तसेच दोन्ही गटात ११११ रु. प्रोत्साहनपर बक्षिस ८ स्पर्धकांना देण्यात आले. तसेच सहभागी बालगोपालांना हासुरे अंक लिपी प्रमाणपत्र भोजारा भेट वस्तु म्हणून देण्यात आले. या कार्यक्रम अध्यक्षस्थानी विश्व हिंदु परिषद जिल्हा अध्यक्ष वामनरावजी फाये, विशेष अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दोषहरराव फाये, सामाजिक कार्यकर्ते विलासराव गांवडे, माजी नगराध्यक्ष रविद्र गोटेफोडे, नगर परिषद सभापती अँड. उमेश वालदे, प्रतिष्ठित व्यापारी विजयजी झंवर, सेवानिवृत्त प्राचार्य चैतरामजी दखने, पत्रकार संघाचे सचिव नासिरभाऊ हाशमी, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, मुरलीधर देशमुख, डॉ. बाबुलाल कावळे, सहारे मेजर, आशाताई बानबले, सुधाताई नाकाडे, नगसेविका दुर्गाताई गोटेफोडे, नगरसेविका अल्काताई गिरडकर, अतुल झोडे, उल्हास देशमुख, दामोधर उईके, गितेश्वर उईके, न. प. सभापती गौरीताई उईके, सागर निरकांरी व प्रतिष्ठित मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या स्पर्धांंचे परिक्षक म्हणून नरेश मांडवे, खुशालराव फुलबांधे, रश्मीताई सोनवाणे, रश्मी मोगरे, प्यारेलाल दाऊदसरे, धम्मप्रिया टेंभुळकर यांनी केले.
नंदीबैलांसह बालगोपालांनी व माता बंधु भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांगदेव फाये, संचालन विनोद नागपूरकर तर आभार प्रदर्शन अतुल झोडे यांनी केले.
कार्यक्रम यस्ववीतेसाठी गुणवंत फाये, नागेश फाये, मनिष फाये, उल्हास महाजन, देवेद्र फाये, विनोद नागपूरकर, राहुल गिरडकर, उल्हास देशमुख, विवेक शिंदे, प्रशांत हटवार, स्वप्नील खोब्रागडे, हरिष टेलका, आशिष महाजन, मनिष बन्सोड, विवेक शिंदे, दिवासु कांबळे, श्रीराम उत्सव समिती सर्व सदस्य गण, युवक, महिला, बालगोपालांंचे माता पालक व कुरखेडा नगरवासिय बंधु भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.