गडचिरोली पोलीस दलातील 41 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस शौर्य पदक तर 2 जवानांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी मिळाले पोलीस पदक

186

– गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पोलीस दलात कार्यरत असताना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणा­ऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुध्दा गडचिरोली पोलीस दलातील 41 अधिकारी/अंमलदारांना पोलीस शौर्य पदक तर 2 पोलीस अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदकाने सन्मानित करण्यात आले. निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे.
पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार 1) श्री. मनिष कलवानिया भापोसे. पोलीस अधीक्षक औरंगाबाद, 2) श्री. समीर शेख भापोसे., अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली, 3) श्री. भाऊसाहेब ढोले, डिवायएसपी, 4) पोनि संदिप भांड, 5) पोनि संदिप मंडलिक (1st BAR TO PMG), 6) सपोनि महारूद्र परजने, 7) सपोनि मोतिराम मडावी (1st, 2nd BAR TO PMG), 8) सपोनि योगिराज जाधव, 9) पोउपनि राजरत्न खैरनार, 10) पोउपनि दयानंद महाडेश्वर, 11) पोउपनि हर्षल जाधव, 12) शहीद पोेउपनि धनाजी होनमाने (मरणोत्तर), 13) पोहवा/ स्व. जगदेव मडावी (मरणोत्तर), 14) पोहवा/ सेवकराम मडावी, 15) नापोशि/ राजु कांदो, 16) नापोशि/ दामोधर चिंतुरी, 17) नापोशि/ राजकुमार भलावी, 18) नापोशि/ सागर मुल्लेवार, 19) नापोशि/ शंकर मडावी, 20) नापोशि/ रमेश आसम, 21) नापोशि/ जिवन उसेंडी, 22) नापोशि/ राजेंद्र मडावी, 23) नापोशि/ मनोज गज्जमवार, 24) नापोशि/ सुभाष वाढई, 25) नापोशि/ दसरू कुरसामी, 26) पोशि/ अविनाश कुमरे, 27) पोशि/ गोंगलु तिम्मा, 28) पोशि/ महेश सयाम, 29) पोशि/ साईकृपा मिरकुटे, 30) पोशि/ रत्नय्या गोरगुंडा, 31) पोशि/ विलास पदा, 32) पोशि/ मनोज इस्कापे, 33) पोशि/ अशोक मज्जी, 34) पोशि/ देवेंद्र पाकमोडे, 35) पोशि/ रोहित गोंगले, 36) पोशि/ दिपक विडपी, 37) पोशि/ सुरज गंजिवार, 38) शहीद पोशि/ किशोर आत्राम (मरणोत्तर), 39) पोशि/ योगेश्वर सडमेक, 40) पोशि/ अंकुश खंडाळे, 41) पोशि/ गजानन आत्राम या जवानांना पोलीस शौर्य पदक मिळाले असून 1) सहा.फौ/ प्रविण बेझलवार, 2) सहा.फौ/ प्रमोद ढोरे यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहेत.
पोलीस शौर्य पदक प्राप्त सर्व पोेलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असताना उल्लेखनिय व वैशिष्टपुर्ण कामगिरी केलेली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना पोलीस शौर्य पदक बहाल करण्यात आलेले आहे. सदर पोेलीस अधिकारी व अंमलदारांनी उल्लेखनिय व वैशिष्टयपुर्ण कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने त्यांचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांनी कौतुक केले असून त्यांच्या पुढील सेवेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.