भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न ; विविध विषयांंवर चर्चा 

68

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आणि हर घर तिरंगा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा  जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विविध  विषयांंवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, भाजपा संघटनमंत्री रविभाऊ ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, गोंविद सारडा, प्रशांत वाघरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा प्रभारी अनिल डोंगरे, भाजयुमो गडचिरोली जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, गडचिरोली भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, आरमोरी नगराध्यक्ष तथा भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष पवन नारनवरे, जिल्हा महामंत्री अनिल तिडके, मधुकर भांडेकर, आशिष कोडाप आदी उपस्थित होते.

१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस या कालावधीत हर घर तिरंगा तसेच तिरंगा यात्रेचे यात्रेचे आयोजन भाजयुमोच्या वतीने करण्यात येत असून भाजयुमोच्या वतीने राबविलेल्या उपक्रमांंची माहिती जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांनी दिली व युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आझादी का अमृत महोत्सवी कार्यक्रममध्ये जास्तीत जास्त युवकांना सहभागी करावे, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले. तसेच भाजपा जेष्ठ नेते यांच्या उपस्थितीत आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समितीच्या  निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत निवडणुकीच्या संदर्भात बैठकीमध्ये विविध विषयांंवर चर्चा करण्यात आली आह. या बैठकीला गडचिरोली भाजपा जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे, जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, अनिल डोंगरे युवा मोर्चा प्रभारी आदींंनी मार्गदर्शन केले.

या बैठकीला भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी  सागर कुंभरे, हर्षल गेडाम, घनश्याम मडावी, सारंग साळवे, विनोद नागपूरकर, प्रशांत हटवार, सुरेश कांटेगे, दिपक सातपुते, राजु शेरकी, अमोल खेडकर, तसेच सर्व तालुक्याचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मंचावर उपस्थित मान्यवरांच्या भाषणात आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्याने आपापल्या वॉर्डातील बूथ निहाय रचना करून, लोकांच्या बैठका घेऊन लोकांना विविध योजना विषयी माहिती देऊन राबविल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना व युवकांना होईल असे प्रयत्न करावे, असे मार्गदर्शनातून सांगितले.                या कार्यक्रमाचे प्रास्तविक चांगदेव फाये, संचालन जिल्हा महामंत्री अनिल तिडके यांनी केले तर आभार मधुकर भांडेकर यांनी मानले.