वैरागड ते गडचिरोलीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

48

– रस्त्याची दुरुस्ती करा : भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांची प्रशासनाकडे मागणी

गडचिरोली : वैरागड गावावरुन ठाणेगावमार्ग गडचिरोलीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे या रस्त्यावरुन मार्गक्रमण करण्यासाठी कोरची व कुरखेडा तालुक्यातील हजारो लोक या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये, कुरखेडा भाजयुमो प्रमुख विनोद नागपूरकर, तालुका महामंत्री उल्हास देशमुख, जिल्हा सचिव नगरसेवक अतुल झोडे, जिल्हा सचिव प्रशांत हटवार यांनी केले.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळे अवकाळी आलेल्या पावसामुळे या खड्ड्यामध्ये पाणी साचुन राहत असल्यामुळे रस्तावर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती दिसून येत असून या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक दुचाकीस्वाराचे अपघात झाले आहे. अनेक महिण्यापासून रस्त्याची दुरवस्था असून सुध्दा या रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
या रस्त्याच्या संदर्भात संबधित विभागाने नागरिकांची रस्ताची समस्या लक्षात त्काळ रस्त्याच्या दुरुस्तीकरणाकडे लक्ष देवून सदर समस्या दूूर करावी, अशी मागणी भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, विनोद नागपूरकर, उल्हास देशमुख, अतुल झोडे, प्रशांत हटवार व पदाधिकारी यांनी केली आहे.