विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय संस्कृतीत गुरुपौणिमा दिवस अतिशय महत्वाचा मानला जात असतो. या दिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी प्रदेशाने दिलेल्या सुचनेनुसार गुरुपौर्णिमाचे औचित्य साधून कुरखेडा शहरातील आध्यात्मिक व आरोग्य सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुरूचा सन्मान करण्यासाठी जेष्ठ व्यक्तींचे सत्कार भारतीय जनता युवा मोर्चा कुरखेडाच्या वतीने करण्यात आले. यावेळी कुरखेडा येथील श्री भगवान महादेव देवस्थान कमेटीचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक डॉ. तेजराम नामदेवराव बुद्धे तसेच अध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे मिश्रा महाराज यांचा सत्कार करुन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य चांगदेव फाये, भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष तथा नगरसेवक रविंद्र गोटेफोडे, नगरसेवक सागर निरंकारी, नगरसेवक तथा भाजयुमो जिल्हा सचिव अतुल झोडे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर, भाजयुमो तालुका महामंत्री तुषार कुथे, तालुका उपाध्यक्ष मंगेश मांडवे, आंधळीचे सामाजिक कार्यकर्ते दिंगाबंर नाकाडे, युवा कार्यकर्ते नितीन पोहनकर, कागदे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉ. बुद्धे यांनी आपल्या अनेक जुन्या आठवणी सांगितले.